दुसर्‍या मजल्यावरून पडल्याने एक वर्षीय चिमुरडीचा मृत्यू
स्थानिक बातम्या

दुसर्‍या मजल्यावरून पडल्याने एक वर्षीय चिमुरडीचा मृत्यू

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक । दुसर्‍या मजल्यावरील घराच्या ग्रीलमधून खाली पडल्याने एक वर्षीय बालिकेचा अंत झाल्याची हृदयद्रावक घटना उपनगर येथील सिंधी कॉनलीत घडली. उपचारादरम्यान बालिकेचा मृत्यू झाला असून याबाबत उपनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

आशिका कल्पेश तारवाणी (वय-1 वर्ष, रा.ब्लॉक नं-10/4, सिंधी कॉलनी, उपनगर, नाशिक) असे बालिकेचे नाव आहे.  शुक्रवारी (दि.24) सायंकाळी साडेपाच वाजता आशिका ही दुसर्‍या मजल्यावर असलेल्या घराच्या ग्रीलमधून खाली कोसळली.

ही घटना लक्षात येताच तिला खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र वैद्यकीय आधिकार्‍यांनी तपासून मृत घोषित केले. याबाबत हवालदार चौधरी तपास करीत आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com