Friday, April 26, 2024
Homeनाशिकमालेगावी पुन्हा एक करोना पॉझिटिव्ह; रुग्णांचा आकडा २९ वर; जिल्ह्यात ३५ रुग्ण...

मालेगावी पुन्हा एक करोना पॉझिटिव्ह; रुग्णांचा आकडा २९ वर; जिल्ह्यात ३५ रुग्ण बाधित

नाशिक  | प्रतिनिधी

मालेगाव शहरातील करोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. आज प्राप्त झालेल्या अहवालात पुन्हा एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह सिद्ध झाला आहे. त्यामुळे मालेगाव येथील रुग्णसंख्या २९ वर पोहोचली आहे.

- Advertisement -

आज मालेगावचे आठ अहवाल मिळाले. यामध्ये सात अहवाल निगेटिव्ह तर एक अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. हा व्यक्ती पूर्वीच्या पॉझिटीव्ह कुटुंबातील निकटवर्तीय सदस्य असल्याचे बोलले जात आहे.

त्यामुळे मालेगावमधील एकूण पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या  २९ वर पोहोचली आहे. यामध्ये एका मृताच समावेश आहे. तर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या  ३५ वर पोहोचली आहे.

काल (दि. १२) अवघ्या २४ तासांत शहरातील कोरोना रुग्णांचा आकडा १८ ने वाढला होता. यामुळे रुग्णसंख्या अचानक २७ च्या घरात पोहोचली होती.  तर  नाशिक जिल्ह्यात आज सिन्नर तालुक्यातील एक रुग्ण सिद्ध झाल्यामुळे रुग्णसंख्या आता ३५ वर पोहोचली आहे.

कोरोनामुळे एका रुग्णाला आधीच प्राण गमवावे लागले असल्याने शहरातील करोना संक्रमण रोखणे हे यंत्रणांपुढील मोठे आव्हान बनले आहे.

मालेगावी या संकटाला सामोरे जाण्यासाठी ऑपरेशन सेंटरमधून समन्वय सुलभ व्हावा यासाठी जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी विशेष आयएएस अधिकाऱ्याची याठिकाणी नियुक्ती केली आहे.

सुरुवातीला मालेगाव शहरात करोनाचे पहिले ५ रुग्ण आढळून आल्यानंतर सातत्याने त्यात वाढच होतच आहे. आज रुग्णसंख्या २८ वर पोहोचल्यामुळे मालेगावमधील प्रशासनाचे या गंभीर परिस्थितीला तोंड देण्यासाठी खासगी दवाखाने उपचारासाठी तयार ठेवले आहेत.

पोलीस यंत्रणा, जिल्हा प्रशासन याठिकाणी ठाण मांडून आहे. आलेल्या परिस्थितीला तोंड देऊन कोरोनामुक्त मालेगाव करण्याचा संकल्प त्यांच्याकडून केला जात आहे. अजूनही मालेगावच्या काही भागात नागरिक घराबाहेर पडताना दिसून येतात. त्यांनाही आवर घालावा लागणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या