कसबे-सुकेणे येथे पाण्यात बुडून एकाचा मृत्यू
स्थानिक बातम्या

कसबे-सुकेणे येथे पाण्यात बुडून एकाचा मृत्यू

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

ओझर | वार्ताहर

कसबे-सुकेणे शिवारात बाणगंगा नदीत मासे पकडण्यास गेलेल्या एका व्यक्तीचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. अधिक माहिती अशी की,  कसबे सुकेणे येथे आज दुपारी 12 वाजेच्या सुमारास रामनाथ काशिनाथ कोटील (वय 50,  रा. वाल्मीक नगर कसबे सुकेणे शिवार) हा बाणगंगा नदीत मासे  पकडण्यासाठी गेला होता.

यादरम्यान तोल जाऊन ते पाण्यात पडले. त्यांच्या नाका तोडांत पाणी गेल्याने त्याचा जागीच म्रुत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच ओझर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.

यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह पिंपळगांव येथे पाठविण्यात आला होता. यासंदर्भात ओझर पोलिसांनी आकस्मात म्रुत्यूची नोंद केली असुन अधिक तपास हवालदार बापू आहेर करीत आहे.

Deshdoot
www.deshdoot.com