दुःखद बातमी : नाशिकमध्ये आढळला कोरोनाचा रुग्ण; प्रकृती स्थिर
स्थानिक बातम्या

दुःखद बातमी : नाशिकमध्ये आढळला कोरोनाचा रुग्ण; प्रकृती स्थिर

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक l प्रतिनिधी

नाशिकमध्ये करोना बाधित रुग्ण आढळला आहे. हा रुग्ण निफाड तालुक्यातील असल्याची प्राथमिक माहिती आहे.

आज  ९ संशयित रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी ८ जन निगेटिव्ह तर एक जन पॉजिटिव्ह आल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली.

आतापर्यंत नाशिकमध्ये 73 संशयित रुग्ण मिळून आले होते. त्यापैकी 72 नमुने निगेटिव्ह आले आहेत.
एक रुग्ण पॉझिटिव्ह आला असून प्रकृती स्थिर असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

नाशिकमध्ये दाखल झालेल्या संशयित रुग्णांमध्ये 69 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.

रुग्ण जरी आढळला असला तरीदेखील आपल्याकडे चांगली तज्ञ डॉक्टरांची टीम आहे. या रुग्णाची प्रकृती स्थिर असून तज्ञ डॉक्टरांच्या मदतीने या संकटातून रुग्णाला आपण बाहेर काढू असे जिल्हाधिकारी म्हणाले.

Deshdoot
www.deshdoot.com