पिंपळगाव बसवंत बाजार समितीला ओडिसा बाजार समिती शिष्टमंडळाची भेट
स्थानिक बातम्या

पिंपळगाव बसवंत बाजार समितीला ओडिसा बाजार समिती शिष्टमंडळाची भेट

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

पिंपळगाव ब | वार्ताहर
पिंपळगाव बसवंत क्रुषी उत्पन्न बाजार समिती ला ओडिसा राज्यातील अंगुल बाजार समिती च्या संचालक मंडळाने भेट देऊन कामकाजाची माहिती घेतली.
ओडिसा राज्यात एकूण 58 बाजार समिती असुन बाजार समितीवर चेअरमन पदावर शासनाचा अधिकारी असतो. व्हाईस चेअरमन व संचालक हे शेतकरी गटाचे असतात.
शासनाचे चेअरमन असल्याने शेतकरी हिताचे निर्णय तसेच बाजार समितीचा विकासाला अडचणी येतात. महाराष्ट्रातील बाजार समितीचा विकास हा चेअरमन व संचालकाना अधिकार असुन बाजार समिती शेतकरी च मालक असल्याने फक्त विकासच दिसतो.
यातच पिंपळगाव बसवंत सारखी बाजार समिती आम्ही कुठेच पाहिली नाही पारदर्शकपणे कारभार व शेतकरी हिताचे निर्णय अशी सुविधा ओडिसात बघायला मिळत नसल्याची प्रतिक्रीया अंगुल बाजार समितीचे व्हा चेअरमन बावरी बंधु महापात्रा यांनी दिली बाजार समितीच्या कामकाजाबाबत आमदार दिलीप बनकर यांनी प्रत्यक्ष कांदा निलावात भेट देऊन खुली लिलाव पध्दत बाबतीत माहिती दिली.
यावेळी अंगुल बाजार समिती चे संचालक तसेच पिंपळगाव बसवंत बाजार समिती चे संचालक सुरेश खोडे.नारायण पोटे सचिव संजय पाटील आदि उपस्थित होते.
Deshdoot
www.deshdoot.com