Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकवाजवा रे वाजवा! मध्यरात्री १२ वाजेपर्यंत ‘डीजे’च्या दणदणाटाला परवानगी

वाजवा रे वाजवा! मध्यरात्री १२ वाजेपर्यंत ‘डीजे’च्या दणदणाटाला परवानगी

गणेशोत्सवासह नवरात्र, दिवाळीत रात्री १२ पर्यंत वाद्य वाजविता येणार

नाशिक | प्रतिनिधी

ध्वनीप्रदूषण नियंत्रणासाठी संपूर्ण देशभर रात्री १० वाजेनंतर वाद्य वाजविण्यावर बंदी आहे. त्यामुळे सण -उत्सवाहांवरही विरजन पडत असल्याची टीका नेहमीच होते. मात्र यंदाच्या वर्षातील १५ दिवस रात्री १२ पर्यंत वाद्य वाजविण्यास परवानगी देण्यासाठी नाशिक जिल्हाधिकाऱ्यांना परवानगी देण्यात आली आहे.

- Advertisement -

त्यानुसार नाशिक जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या अधिकारात आगामी वर्षातील १२ वाजेपर्यंत वाद्य वाजविण्यास परवानगी असलेले १० दिवस जाहीर केले आहे. त्यात गणेशोत्सव, नरात्रोत्सव, दिवाळी, ईदसह इतर सण उत्सवात रात्री १२ वाजेपर्यंत वाद्य वाजविण्यास परवानगी देण्यात आली आहे.

केंद्र शासनाच्या पर्यावरण मंत्रालयाच्या ध्वनिप्रदूषण नियमानुसार श्रोतृगृहे, सभागृहे, सामुहिक सभागृहे आणि मेजवानी कक्ष यांसारख्या बंदिस्त जागांव्यतिरिक्त इतर ठिकाणी सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत वाद्य वापरण्याची परवानगी दिलेली होती.

त्यामध्ये ११ ऑक्टोबर २००२ मध्ये सुधारणा करण्यात आली. ध्वनिप्रदूषणाची पातळी निश्चित केलेल्या मर्यादेत ठेवत रात्री दहा ऐवजी बारा वाजेपर्यंत ध्वनिवर्धक वाजविण्यासाठी वर्षातील १५ दिवस परवानगी देण्यात आली.

पण त्याचाही गैरवापर झाल्याने केंद्र शासनाने १० ऑगस्ट २०१७ च्या अधिसूचनेद्वारे या नियमांत आणखी सुधारणा केली. खुल्या जागेत विविध कार्यक्रम, सण-उत्सवांसाठी सकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक वापरासाठी परवानगी देण्याची जबाबदारी राज्य शासनाबरोबरच जिल्हाधिकारी व पालिका आयुक्तांवरच सोपविली आहे.

त्यानुसार बंदिस्त जागा सोडून खुल्या जागेत एका वर्षांत फक्त १५ दिवसच ध्वनिवर्धकाचा वापर करण्याची परवानगी द्यायची आहे. १ जानेवारी ते ३१ डिसेंबर या कालावधीत पंधरा दिवस निश्चित करून त्याची आगाऊ यादी जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केली आहे. सध्या दहा दिवसांसाठी रात्री १२ वाजेपर्यंत लाउडस्पिकर वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे.

या दिवशी रात्री १२ पर्यंत सुरु राहणार डीजे

शिवाजी महाराज जयंती १९ फेब्रुवारी,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती १४ एप्रिल २०२०,
गणेशोत्सव ३१ ऑगस्ट (गणेश आरास पाहण्यासाठी )
१ सप्टेंबर (गणेश विसर्जन मिरवणूक)
नवरात्रोत्सव २४ ऑक्टोबर (दुर्गाष्टमी)
२५ ऑक्टोबर (दसरा)
ईद ए मिलाद ३१ ऑक्टोबर
दिवाळी १४ नोव्हेंबर
ख्रिसमस २५ डिसेंबर
नववर्ष स्वागत ३१ डिसेंबर

- Advertisment -

ताज्या बातम्या