महापालिकेशिवाय कोणीही निर्जंतुकीकरण करु नये; महापालिकेच्या अ‍ॅप वापराचे आवाहन
स्थानिक बातम्या

महापालिकेशिवाय कोणीही निर्जंतुकीकरण करु नये; महापालिकेच्या अ‍ॅप वापराचे आवाहन

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक । प्रतिनिधी

कारोनाच्या पार्श्वभूमीवर या साथीचा प्रादुर्भाव रोकण्यासाठी केंद्र शासनाने शहरात निर्जंतुकीकरण फवारणी करण्यासंदर्भात मार्गदर्शन सुचना केल्या आहेत. यामुळे महापालिका प्रशासनाशिवाय अन्य खाजगी संस्था किंवा व्यक्ती यांनी निर्जंतुकीकरण फवारणी करु नये असे आज महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी स्पष्ट केले.

करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमी महापालिकेकडुन शहरात करण्यात आलेल्या आणि सुरू असलेल्या उपाय योजनाचा आढावा बैठकीत महापालिकेच्या खाते प्रमुखांना आयुक्तांनी काही महत्वाच्या सुचना केल्या.

शहरात ठिकठिकाणी करण्यात येणारी औषध फवारणी शासन निर्णयानुसार महापालिकेच्या साधन सामुग्रीचा वापर करुनच महापालिका कर्मचार्‍यांकडुन महापालिकेच्या स्तरावर होईल, शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करा, असे निर्देश आयुक्तांनी अधिकार्‍यांना दिले.

करोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने उपाय योजना व दक्षता घेण्यासंदर्भात तयार करण्यात आलेल्या 31 पथकांना दिलेल्या सुचनेनुसार कामास गती देण्यात यावीत. शहर स्वच्छ ठेवण्याच्या दष्टीने काम करतांनाच शहरात कुठेही ब्लॅकस्पॉट राहणार नाही याची काळजी संबंधीतांनी घ्यावी.

शहरात बेघर, मोलमजूरी करणारे मजुर व कामगार यांच्यासाठी सहा विभागात निवारा केंद्र सुरू करण्यात आली असुन यांची व्यवस्था केल्यानंतर त्यांना प्राथमिक सुविधा पुरविण्यात याव्यात.

तसेच शहरात भरत असलेल्या आठवडे बाजारात सोशल डिस्टनसिंगचे पालन होत नसुन गर्दी होत आहे. यामुळे यावर संबंधीतांनी उपाय योजना कराव्यात असेही आयुक्तांनी खातेप्रमुखांना सांगितले.

महापालिकेच्यावतीने नुकतेच करोनाचा प्रादुर्भाव रोकण्याच्या दृष्टीने व सतर्कतेसाठी NMC COVID, MAHAKAVCH APP सेल्फ असेसमेंट व नाशिक बाजार असे अ‍ॅप कार्यान्वीत करण्यात आले आहे. याचा नागरिकांनी जास्तीत जास्त वापर करावा आणि लाभ घ्यावा असे आवाहन आयुक्त गमे यांनी केले.

Deshdoot
www.deshdoot.com