पंचवटीत अवैध स्पा सेंटरवर निर्भया पथकाचा छापा
स्थानिक बातम्या

पंचवटीत अवैध स्पा सेंटरवर निर्भया पथकाचा छापा

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

पंचवटी । वार्ताहर

पंचवटी कारंजा पोलीस चौकीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या अवैध स्पा सेंटरवर शुक्रवारी सायंकाळी निर्भया पथकाने छापा टाकत अनैतिक व्यवसाय करून घेणार्‍या दलाल महिलेसह एकूण चार महिलांना ताब्यात घेतले असून या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,पंचवटी कारंजा परिसरात स्पा सेंटरच्या नावाखाली अनैतिक व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौघुले यांना गुप्त बातमी दाराकडून मिळाली होती.

या माहितीच्या आधारे पोलिस उपनिरीक्षक गायत्री जाधव, होंडे, तेलोरे,सहायक पोलिस उपनिरीक्षक संजय सूर्यवंशी,महिला पोलीस शिपाई रोहिणी भामरे, रेखा धुळे, एस सी संगमनेरे, झगडे यांनी पंचवटी कारंजा येथील मानस हॉटेल शेजारील वसंत सिटी मॉल मधील दुसरा मजल्यावर निरामय मेडी स्पा येथे बनावट ग्राहक पाठवून खात्री केल्यानंतर सायंकाळी छापा टाकला.

या ठिकाणाहून एका संशयित आरोपी महिलेसह तीन पीडित महिलांना ताब्यात घेण्यात आले आहे.या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करीत आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com