बँकेंची ९ लाखाची फसवणूक; छत्तीसगढला घडलेल्या घटनेचा नाशकात गुन्हा

बँकेंची ९ लाखाची फसवणूक; छत्तीसगढला घडलेल्या घटनेचा नाशकात गुन्हा

नाशिक | प्रतिनिधी

बनावट चेक द्वारे दोन भामट्यांनी छत्तीसगढ विद्यूत वितरण कंपनी तसेच कंपनीचे खाते असलेल्या पंजाब ऍण्ड महाराष्ट्र को ऑप बँकेची ९ लाख १६ हजार २०० रूपयांची फसवणुक केली आहे. सबंधीत बँकेचे क्लेअरन्स कार्यालय नाशिक येथे असल्याने या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात फसणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी पंजाब ऍण्ड महाराष्ट्र को ऑप बँक व अभ्युद्य बँक कॅनडा कॉर्नर बँकेचे व्यावस्थापक राजभोज यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार २६ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर २०१८ या कालावधीत संशयित करिष्मा मनुभाई सेलवाडीया याने पंजाब ऍण्ड महाराष्ट्र को ऑप बँकेच्या कॅनडा कॉर्नर येथील शाखेत. त्याचा छत्तीसगड राज्य विद्यूत वितरण कंपनीचा युनीयन अँक ऑफ इंडियाच्या पुराणी वस्ती लिला चौक रायपुर, छत्तीसगढ येथील सी सी खात्यात ८ लाख ८० हजार ९२९ चेक जमा करून त्यातील ८ लाख ७९ हजार ६६५ रूपयांची रक्कम काढून अपहार केला.

तर दुसर्‍या प्रकरणात संशयित गणपत रावजी गायकवाड याने त्याचा अभ्युद्य रो. ऑ. बँकच्या कॅनडा कॉर्नर शाखेत पुन्हा छत्तीसगढ राज्य विद्यूत वितरण कंपनीचा युनीयन बँक ऑफ इंडियाच्या रायपुर  येथील शाखेतून १९ लाख ५० हजार ९३० रूपयांचा बनावट चेक भरला यातील रकमेचा अपहार सुरू असताना खाते सील केल्याने यातील ३५ हजार ३४९ रूपये संशयित काढू शकले.  उर्वरीत रक्कम बचावली.

हे दोन्ही प्रकार लक्षात आल्यानंतर छत्तीसगढ विद्यूत वितरण कंपनी व बँकेने चौकशी केल्यानंतर हा प्रकार समोर आला. अंतर्गत चौकशीनंतर अखेर पंजाब व महाराष्ट्र को ऑप बंकेचे क्लिअरींग हाऊस नाशिक येथे असल्याने व येथून ते चेक पास झाल्याने या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरिक्षक संदिप पवार करत आहेत

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com