Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकनिफाड : चांदोरी होऊ शकते चित्रीकरणासाठी ‘बेस्ट डेस्टिनेशन’

निफाड : चांदोरी होऊ शकते चित्रीकरणासाठी ‘बेस्ट डेस्टिनेशन’

देशदूत डिजिटल विशेष

नाशिक | प्रतिनिधी 

गोदावरीला पूर आला की, चांदोरी आणि सायखेडा गावाचा संपर्क तुटतो असे अनेकदा आपण ऐकले असेल. दोन्ही गावांमध्ये केवळ नदी आडवी आहे. याठिकाणी लहान मोठी मंदिरे आहेत; गावामध्ये अनेक लहान मोठे वाडे देखील आहेत.

- Advertisement -

यामुळे ऐतिहासिक वारसा लाभलेल्या चांदोरीमध्ये चित्रपटांच्या शुटींगसाठी बेस्ट लोकेशन्स आहेत. याठिकाणी १९१९ साली चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांनी दिग्दर्शित केलेला कालिया मर्दन मूक चित्रपटात चांदोरी गावातील, नदी, वाड्यांचा समावेश आहे. याठिकाणी गोदामाईचे तुडुंब भरलेले पात्र बघायला मिळते आणि येथील मंदिरांच्या वरून उड्या मारून पाण्यात पोहण्याचा आनंद घेताना याठिकाणी दिसून येतात.

आजही ही मंदिरे नदीपात्रात आहेत. पावसाळ्यात गोदावरीच्या वाहत्या पाण्यात ही मंदिरे संपूर्ण मोसम बुडालेली दिसून येतात. गोदावरीचे पाणी कमी झाली की मंदिरे पाहून चांदोरीचा ऐतिहासिक वारसा किती प्रगल्भ असावा याची प्रचीती आल्याशिवाय राहत नाही.

चांदोरीच्या दक्षिणनेकडून गोदावरी नदी वाहत जाते. विविध प्रकारची हेमांडपंथी मंदिरे, त्या मंदिरांची असलेली माहिती, प्रती जेजुरी म्हणून ओळखले जाणारे खंडेराव महाराजांचे मंदिर यामुळे चांदोरी तीर्थक्षेत्र आहे.

गावात जुनी घरे, वाडे आहेत.  चित्रीकरणाच्या संधी निर्माण झाल्यास चांदोरी व परिसर पर्यटनाच्या पटलावर येऊ शकतो. सन १९१९ मध्ये दादासाहेब फाळके यांनी कालिया मर्दन या मुकचित्रपटाचे चित्रीकरण चांदोरी व सायखेडा परिसरात केले आहे तर दिग्दर्शक राजदत्त यांच्या वि दा सावरकर मालिकेचे शूटिंग ही चांदोरीस झालेले होते.

गणेश हिंगणे यांनी छपन्न खोल्यांचा प्रशस्त वाडा चांदोरीत 1762 मध्ये बांधला. हिंगणे यांचे काही वाडे झाशी येथे व नाशिकमधील भद्रकालीतही आहेत.

हिंगणे यांच्याकडे दहा हजार एकर भूभागाची जहागिरी 1953 पर्यंत होती. ब्रिटिशांनी सरदार राजेबहादूर, सरदार विंचूरकर व सरदार हिंगणे यांचीच सरदारकी नाशिक जिल्ह्यात मंजूर केली होती.

चांदोरी परिसरात जमीन व महसुल यांची मालकी ही हिंगणे यांच्याकडेच होती. त्यांच्या पराक्रमांची साक्ष देणारा चांदोरीतील हिंगणे वाडा तो इतिहास उलगडून सांगतो. हिंगणे वाड्यातील अनेक वस्तू रशिया-ब्रिटनमधील वस्तूसंग्रहालयात असल्याचे बोलले जाते. परिसरातील शेती सधन आहे. ऊस व द्राक्ष पिकांचे भरघोस आणि दर्जेदार उत्पादन याठिकाणी घेतले जाते. त्यामुळे येथील वातावरण नेहमीच प्रसन्न असते.

करोनाच्या सावटामुळे सर्वत्र चित्रपटांचे चित्रीकरण बंद होत्या. अलीकडेच सांस्कृतिक कार्य विभागाने शुटींगसाठी परवानगी घेतल्यास नियम आणि अटी घालून देत परवानगी देण्यास सुरुवात केली आहे. नाशिकमध्येही अनेक दिग्दर्शक, निर्माते सध्या चित्रीकरणासाठी रस दाखवत आहेत. त्यामुळे चांदोरीतील ऐतिहासिक जागा चित्रीकरणासाठी उत्तम डेस्टिनेशन असल्याचे बोलले जात आहे. दादासाहेब फाळके यांनी १९१९ मध्ये कालिया मर्दनची निर्मिती केली होती. या चित्रपटाचा व्हिडीओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा.

भारतीय फिल्म सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांनी कालिया मर्दन हा मुक चित्रपट सन १९१९ म्हणजे तब्बल १०० वर्षा पुर्वी बनविला होता.
सांगायला आनंद होतो की,या संपुर्ण चित्रपटाचे चित्रीकरण हे सायखेडा व चांदोरी या गावांत झाले होते.
आपणांस कदाचित विश्वास बसणार नाही पण हे खरं आहे..

त्यासाठी आवर्जून पहा
1:35 ते 2.50 – गंगे वरील शूटिंग
31:20 ते 32:09 – चांदोरी नदीतील बुडालेली मंदिरे
32:26 ते 32:50 – चांदोरी गंगेवरील जुना घाट
34:32 ते 34:50 : कलावती आत्यांचे जुने राम मंदिराची मागील बाजु.
35:17 ते 35:40 – सायखेडा मठ, वंजार गल्ली,तेथील वेस
37:49 ते 38:56 – संपूर्ण वंजार गल्ली, सायखेडा
नक्की पहा सायखेडा चांदोरीचे जुने वैभव.

- Advertisment -

ताज्या बातम्या