कोरोना : 2400 रेल्वे रद्द; खानपान सेवा बंद
स्थानिक बातम्या

कोरोना : 2400 रेल्वे रद्द; खानपान सेवा बंद

Balvant Gaikwad

कोरोना व्हायरेसमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 मार्च रोजी जनता कर्फ्यू लावण्याची घोषणा केली. यामुळे शनिवारी रात्री 12 वाजेपासून रविवारी रात्री 10 वाजेपर्यंत रेल्वेसेवा बंद होणार आहे.

एकूण 2400 रेल्वे रद्द केल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मेल, एक्स्प्रेस ट्रेनसुद्धा सकाळी 4 वाजता बंद करण्यात येणार आहे.

प्रशासनाने 245 रेल्वे यापूर्वीच रद्द केल्या आहेत. दरम्यान आयआरसीटीसीने पुढील आदेशापयर्र्ंत रेल्वेतील खानपान सेवा बंद केली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com