नेट परीक्षा : अर्ज करण्यासाठी  १५ जूनपर्यंत मुदतवाढ
स्थानिक बातम्या

नेट परीक्षा : अर्ज करण्यासाठी १५ जूनपर्यंत मुदतवाढ

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

पुणे | प्रतिनिधी

सहायक प्राध्यापकांसाठी अनिवार्य असलेल्या राष्ट्रीय पात्रता परीक्षेसाठी (नेट) अर्ज करण्यास १५ जूनपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय नॅशनल टेस्टिंग एजन्सीने घेतला आहे. नियोजित वेळापत्रकानुसार १५ ते २० जून दरम्यान ही परीक्षा होणार होती. मात्र, आता पुन्हा अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आल्याने ही परीक्षा लांबणीवर पडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

देशभरात घेतल्या जाणार्‍या नेट परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी एनटीएकडून ३१ मे पर्यंतची मुदत देण्यात आली होती. टाळेबंदीमुळे अनेक उमेदवारांना अर्ज करण्यास अडचणी आल्या. त्यामुळे अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी देशभरातील उमेदवारांकडून करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर एनटीएकडून मुदतवाढ देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला.

नेटसह सीएसआरआय-यूजीसी नेट, इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाची पीएच.डी. आणि एमबीए प्रवेश परीक्षा, भारतीय कृषी संशोधन परीक्षेसाठीही मुदतवाढ देण्यात आली असून, अर्ज करण्यासाठी १५ जून ही अंतिम मुदत आहे. परीक्षांसाठीचे सुधारित प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठीची माहिती स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार असल्याचे एनटीएकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com