गृहमंत्री अनिल देशमुख आज नाशिकमध्ये
स्थानिक बातम्या

गृहमंत्री अनिल देशमुख आज नाशिकमध्ये

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक । प्रतिनिधी

गृहमंत्री अनिल देशमुख बुधवारी ( दि.२९) नाशिक दौर्‍यावर असून जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी ११ वाजता ते जिल्हयातील करोना परिस्थिती व त्या अनुषंगाने उपाय योजना याचा आढावा घेणार आहेत.

पालकमंत्री छगन भुजबळ, कृषी मंत्री दादा भुसे, विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महापालिका आयुक्त, विशेष पोलिस महानिरिक्षक, पोलिस आयुक्त, जिल्हा शल्य चिकित्सक हे उपस्थित राहणार आहेत.

जिल्ह्यातील करोनाची परिस्थिती, मालेगावमध्ये वाढती रुग्णसंख्या व कायदा सुव्यवस्था याबाबतचा आढावा गृहमंत्री घेतील. सायंकाळी पाच वाजता ते मुंबईकडे प्रयाण करतील.

Deshdoot
www.deshdoot.com