केंद्र सरकारच दंगली घडवत आहे – जितेंद्र आव्हाड यांची टीका
स्थानिक बातम्या

केंद्र सरकारच दंगली घडवत आहे – जितेंद्र आव्हाड यांची टीका

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

मुंबई । प्रतिनिधी

केंद्र सरकार गुजरात दंगलीचे माॅडेल दिल्लीत अवलंबवत आहे. देशात स्वायत्त संस्था राहिली नाही, सर्व स्वायत्त संस्था केंद्राच्या दबावाखाली आहेत. केंद्र सरकार दंगली भडकवत आहे असल्याची टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

आव्हाड म्हणाले,  पाच ते सहा वर्षात आम्ही हे पाहिल आहे की, जे न्यायाधीश सत्ताधारी विचारांच्या विरोधी विचारांचे आहेत. त्याची बदली केली जात आहे. तसेच दिल्ली पोलीस ही दिल्लीची नाही तर केंद्राची असल्याचाही घणाघात आव्हाड यांनी केला.

‘पोलिसांची कार्यप्रणाली ही संभ्रम निर्माण करणारी आहे. शहरात मोठ्याप्रमाणात हिंसा झाली आहे. 1984 च्या शीख विरोधी दंगलीचे साक्षीदार आम्हाला व्हायचं नसल्याचेही आव्हाड म्हणाले.

Deshdoot
www.deshdoot.com