नाशिकच्या साक्षी कानडी, ईश्वरी सावकार, लक्ष्मी यादव यांची महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड
स्थानिक बातम्या

नाशिकच्या साक्षी कानडी, ईश्वरी सावकार, लक्ष्मी यादव यांची महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड

Gaurav Pardeshi

नाशिक | प्रतिनिधी

नाशिकच्या साक्षी कानडी, ईश्वरी सावकार व लक्ष्मी यादव ह्या तीन खेळाडूंची महाराष्ट्रा तर्फे एकोणीस वर्षांखालील महिला क्रिकेट संघात निवड झाली आहे. साक्षी कानडीने पुदुचेरी येथे खेळविण्यात आलेल्या टी-ट्वेंटी सामन्यांच्या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातर्फे तेवीस वर्षां खालील महिला क्रिकेट संघाचे देखील प्रतिनिधित्व केले होते.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, बीसीसीआय तर्फे 19 वर्षांखालील महिलांसाठी 50 षटकांची एकदिवशीय सामन्यांची स्पर्धा आयोजित करण्यात येते. सदर महीला एकदिवशीय सामन्यांच्या स्पर्धेचे साखळी सामने 22 फेब्रुवारी ते 12 मार्च 2020 दरम्यान गुवाहाती, आसाम येथे खेळविले जाणार आहेत.

महाराष्ट्राचे सामने पुढील प्रमाणे होणार आहेत

बंगाल – 22 फेब्रुवारी 2020

केरळ – 23 फेब्रुवारी 2020

ओडीशा – 26 फेब्रुवारी 2020

पंजाब – 29 फेब्रुवारी 2020

हरयाणा – 2 मार्च 2020

राजस्थान – 6 मार्च 2020

मुंबई – 10 मार्च 2020

आसाम – 12 मार्च 2020

तिघींच्या ह्या निवडीमुळे नाशिक जिल्हा क्रिकेट संघटना व संघात आनंदाचे वातावरण झाले आहे. नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सचिव समीर रकटे तसेच संघ प्रशिक्षक व जिल्हा क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी या तीनही युवा महिला क्रिकेटपटूंचे अभिनंदन करून स्पर्धेतील उत्तम कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com