नाशिकरोड कारागृहातील कैद्यांचा आदर्श : मुख्यमंत्री सहायता निधीस दिला २ लाख ७८ हजारांचा धनादेश

नाशिकरोड कारागृहातील कैद्यांचा आदर्श : मुख्यमंत्री सहायता निधीस दिला २ लाख ७८ हजारांचा धनादेश

नाशिकरोड | प्रतिनिधी 

नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह नेहमीच कैद्यांचा वेगवेगळ्या कलाकुसरीने आदर्श ठरते. सध्या देशावर कोरोना या विषाणूचे सावट आहे. टेलरिंग काम करणाऱ्या कैद्यांनी मास्क बनविण्याचे काम तर केलेच शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री सहायता निधीसाठी जवळपास २ लाख ७८ हजारांची ही रक्कम दिली आहे. नुकताच कारागृहाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या रकमेचा धनादेश जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांना सुपूर्द केला आहे.

नाशिकरोड कारागृहातील कैद्यांच्या आदर्शाचे जिल्हाधिकारी मांढरे यांनीदेखील कौतुक केले आहे. कारागृहातील पक्क्या कैद्यांना कायद्यानुसार काम करावे लागते. कारागृहात जवळपास दहा कारखाने असून याठिकाणी हे कैदी काम करतात.

सुतार काम, लोहार काम, विणकाम, मूर्तीकाम, रसायन, बेकरी आदी कारखान्यांचा समावेश आहे. तसेच शेती देखील आहे. शेतीमध्ये प्रामुख्याने पक्के कैदी काम करतात. त्यांना पगार दिला जातो. तो कारागृह प्रशासनाकडे सुरक्षित ठेवला जातो. शिक्षा संपल्यावर किंवा कैद्यांच्या गरजेनुसार हा पगार कैद्यांना दिला जातो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी करोना विषाणूच्या संकटाला तोंड देण्यासाठी विविध संस्था, उद्योग, व्यक्तींना देणगी देण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद म्हणून कारागृह अधीक्षक प्रमोद वाघ, अशोक कारकर यांनी कैद्यांना मदतीचे आवाहन केले होते.

त्याला कैद्यांनी तत्काळ प्रतिसाद दिला व आपल्या पगारातील शंभरापासून हजारापर्यंतची रक्कम सरकारला देण्याचे ठरवले. त्यानुसार २ लाख ७८ हजाराचा निधी जिल्हाधिकान्यांकडे सुपूर्द करण्यात आला. याआधीही केरळच्या पूरग्रस्तांना दोन लाखांच्या वर निधी दिला जमविण्यात आला होता. हा निधी जवळपास कारागृहात असलेल्या तीन हजार पेक्षा अधिक कैद्यांनी दिला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com