नाशिकची माया सोनवणे चॅलेंजर ट्रॉफीसाठी भारत अ संघात

नाशिकची माया सोनवणे चॅलेंजर ट्रॉफीसाठी भारत अ संघात

नाशिक | प्रतिनिधी 

नाशिकच्या सत्यजित बच्छावची रणजी ट्रॉफी संघातील निवडीनंतर नाशिकची महिला क्रिकेटपटू माया सोनवणे ची देखील प्रतिष्ठेच्या चॅलेंजर ट्रॉफीसाठी इंडिया ए संघात निवड झाली आहे.

माया ही उत्तम फिरकीपटू असून नुकतीच पुदुचेरी येथे झालेल्या 23 वर्षाखालील टी-ट्वेंटी सामन्यांच्या स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना तिने चांगली कामगिरी केली.

मागील वर्षी 23 वर्षाखालील महिलांच्या स्पर्धेमध्ये मायाने भारतामध्ये सर्वाधिक 15 गडी बात करण्याचा विक्रम केला होता. सातत्यपूर्ण कामगिरी मुळे तिची चॅलेंजर स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

11 ते 13 डिसेंबर पुदुचेरी येथे इंडिया ए, इंडिया बी व इंडिया सी अशा एकमेकांविरुद्ध तीन सामन्यांच्या नंतर सर्वोत्तम दोन संघांमध्ये 15 डिसेंबरला पुदुचेरी येथेच महिलांच्या 23 वर्षाखालील टी-ट्वेंटी चॅलेंजर ट्रॉफी चा अंतिम सामना होणार आहे. इंडिया ए चे सामने ११ व 13 डिसेंबर रोजी होणार आहेत.

महिला क्रिकेटमधील या निवडीमुळे नाशिकच्या क्रिकेटविश्वात आनंदमय वातावरण निर्माण झाले असून माया सोनवणे चेही नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सचिव समीर रकटे व जिल्हा क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन करून स्पर्धेतील उत्तम कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Last updated

Deshdoot
www.deshdoot.com