नाशिकचा हर्षवर्धन सदगीर महाराष्ट्र केसरीचा मानकरी

नाशिकचा हर्षवर्धन सदगीर महाराष्ट्र केसरीचा मानकरी

नाशिक | प्रतिनिधी 

६२ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरने लातूरचा मल्ल शैलेश शेळके याचा पराभव करत महाराष्ट्र केसरी स्पर्धेवर नाव कोरले.

नगर जिल्ह्यातील अकोले येथील व सध्या नाशिक जिल्ह्यातील हरसूल महाविद्यालयाचा विद्यार्थी असलेला हर्षवर्धन सदगीरने महाराष्ट्र केसरी किताब आपल्या नावे केल्यानंतर नाशिकमध्ये जल्लोष बघायला मिळाला. हर्षवर्धनला मानाची चांदीची गदा देऊन त्याचा सन्मान करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पार यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

हर्षवर्धनने शैलेश शेळके ३ -२ अशा फरकाने नमविले. दोघेही मल्ल एकाच तालमीतील असल्याने शैलेशने आपल्या दोस्ताची म्हणजेच हर्षवर्धनची खांद्यावर बसवून मिरवणूक काढली.

हर्षवर्धनने चांगली खेळी करून नाशिकला महाराष्ट्र केसरीचा किताब मिळवून द्यावा यासाठी सर्वांच्याच नजरा आज होणाऱ्या अंतिम सामन्याकडे खिळलेल्या होत्या. अखेर हर्षवर्धन सदगीर याने प्रतिस्पर्धी  शैलेश शेळके यास धूळ चारत महाराष्ट्र केसरीचा किताबा आपल्या नावे करून इतिहास रचला.

महाराष्ट्र केसरीच्या इतिहासात आज नवा विक्रमादित्य महाराष्ट्राला लाभला आहे. हर्षवर्धन चांगली खेळी करेल आणि नाशिकसह अकोल्याला पहिला महाराष्ट्र केसरी होण्याचा मान मिळेल अशी आशा अनेकांना होती.

हर्षवर्धनला लहानपणापासूनच कुस्तीची आवड असल्याने त्याने लहानपणापासून कुस्तीचे धडे घ्यायला सुरुवात केली होती.  भगूर येथे हर्षवर्धन वास्त्यव्यास असून येथील गोरख बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने अखिल भारतीय हरियाणा येथे स्पर्धा सीसार, पुणे गटाकडून प्रतिनिधित्व केले आहे. या स्पर्धेत सुवर्णपदकही त्याने मिळवले होते.

त्याने गेल्या दोन-तीन वर्षांपासून महारष्ट्र केसरीसाठी प्रयत्न सुरु केले होते. पुरेसे प्रशिक्षण पुणे येथील काका पवार यांच्या अकादमीत त्यांनी कुस्तीचे धडे घेतले.

नाशिकमध्ये याआधी येवल्याचे राजू लोणारी यांनी महाराष्ट्र केसरीच्या अंतिम फेरीत धडक मारली होती,. मात्र, त्यानंतर नाशिक मात्र महाराष्ट्र् केसरी स्पर्धेपासून दूर राहिले होते. यंदा पहिले विजेतेपद मिळवून हर्षवर्धनने इतिहास घडविला.

काल हर्षवर्धनने माजी महाराष्ट्र केसरी अभिजित कटके यास नमवत अंतिम फेरी गाठली होती. हर्षवर्धन सध्या नाशिक जिल्ह्यातील व पेठ तालुक्यातील करंजाळी येथील महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेत आहे. २०१४ साली हर्षवर्धनने उत्तर महाराष्ट्र श्री या स्पर्धेत उपविजेता ठरला होता.

तोपर्यंत त्याने नाशिकमध्येच प्रशिक्षण घेतले होते. मात्र वयानुसार वजनदेखील वाढले असल्याने पुढील शिक्षणासाठी हर्षवर्धन पुण्याला अकादमीत प्रवेश घेतला. गेल्या दोन-तीन वर्षांपासून महारष्ट्र केसरीसाठी प्रयत्न सुरु केले होते. पुरेसे प्रशिक्षण पुणे येथील काका पवार यांच्या अकादमीत त्यांनी कुस्तीचे धडे घेत आहे.

आज दुपारी हरसूल महाविद्यालयात विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी शाळेत जल्लोष केला होता. याच वेळी हर्षवर्धन नक्की ही स्पर्धा गाजवेल असे त्यांच्या शिक्षकांनी म्हटले होते.

चांदीची गदा आमच्या अकादमीतच… 

आज महाराष्ट्र केसरीची अंतिम लढत पार पडली. यात शैलेश शेळके यास नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरने धूळ चारत महाराष्ट्र केसरी होण्याचा मान मिळवला. दोन्हीही कुस्तीगीर पुण्यातील काका पवार यांच्या तालमीतील मल्ल आहेत. त्यामुळे गदा आमच्या अकादमीत आली याचा आनंद असल्याची प्रतिक्रिया काका पवार यांनी दिली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com