Video : नाशिकचा बुद्धिबळपटू विनायक वाडिले यास बिरला यंग इंडियन पुरस्कार
स्थानिक बातम्या

Video : नाशिकचा बुद्धिबळपटू विनायक वाडिले यास बिरला यंग इंडियन पुरस्कार

Dinesh Sonawane

नाशिक | प्रतिनिधी

चंदीगड येथे आयोजित बिरला यंग इंडियन अवॉर्ड २०२० सोहळ्यात आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू विनायक जगन्नाथ वाडिले यांना देशाचा ‘युथ आयकॉन’ या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

संपूर्ण देशातून विविध कार्यक्षेत्रात उच्च पातळीवर काम करणाऱ्या २५ तरुणांची निवड करण्यात आली होती. त्यात नाशिकच्या विनायक याची निवड करण्यात आली.

२०१६ साली विनायकने आशिया खंडातील सर्वात पहिली चेस वेबसाईट सुरवात केली होती आणि आजवर फक्त ३ वर्षातच आकाशाला गवसणी घालत वेबसाईटने १४५ देशातून ५० लाखापेक्षा अधिक बुद्धिबळप्रेमींना जोडले.

तसेच फक्त ऑनलाईनच नव्हे तर विनायक ने अनेक आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करत बुद्धिबळाच्या प्रसार आणि प्रचारासाठी अविरत पणे काम केले. फक्त बुद्धिबळाचा आपली मर्यादा न मानता विनायकने  ‘ओमी’  म्हणजेच ऑर्गनाईझ माय इव्हेंट हे अँप बनवले.

त्यात तुम्ही कुठल्याही प्रकारचे इव्हेंट आयोजित करू शकता.  तसेच ‘सुडो स्विंग’ आणि ‘ पोर्टेबल मोबाइल स्टडी स्टॅन्ड ‘ यांसाठी यूटिलिटी पेटंटला पात्र आहे. यासर्व कार्याचा गौरव करण्यासाठी विनायकला मागील वर्षी ‘मिरची युथ आयकॉन,नाशिक’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

बिर्ला टिएमटी स्टीलने आयोजित केलेल्या या सोहळ्यात संपूर्ण भारतभरातून २१ ते ३५ या वायोगातून फक्त २५ यंग इंडियन्सला निमंत्रित करण्यात आले होते. या सोहळ्याप्रसंगी बिरला ग्रुपचे चेयरमन राज सैनी तसेच सिईओ, माजी संसद सदस्य कुमार मंगलम आणि इतर मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Deshdoot
www.deshdoot.com