‘स्मार्टरोड बनना मुश्किलही नही नामुनकिन है’!; नाशिककरांचा मिम्सच्या माध्यमातून संताप अनावर

jalgaon-digital
2 Min Read

नाशिक । प्रतिनिधी

‘स्मार्ट रोड बनना मुश्किलही नही, नामुनकिन है,’‘तेरे पास क्या है, मेरे पास कभी पुरा न होणे वाला स्मार्ट रोड है’, ‘खामोश फिर कभी न पुछना स्मार्टरोड का काम कब पुरा होगा’, ‘टेन्शेन नही लेने का मामु नाशिक का स्मार्टरोड कभी पुरा नही होगा,’ ‘देड किमी रोड की किमत तुम क्या जानो रमेशबाबु,’ असे मिम्स व्हायरल करत नाशिककरांनी नाशिकच्या स्मार्ट रोडची खिल्ली उडवण्यासह यातूनच संतापही व्यक्त करण्यास सुरूवात केली आहे.

स्मार्टसीटी अंतर्गत त्र्यंबक नाका ते अशोक स्तंभ या स्मार्ट रस्त्याचे काम गेली दोन वर्षांपासून सुरू आहे. हा रोड लवकर पुर्ण व्हावा यासाठी नाशिककरांनी आंदोलनही केले होते. परंतु याचा कुठलाच परिणाम ना कंत्राटदारावर आहे ना प्रशासनावर. आता हा रोड नेटिझन्ससाठी विनोदाचा विषय झाला आहे.

यावरून नाशिककरांनी ट्रोलिंग सुरू केले आहे. रखडलेल्या कामाची खिल्ली उडविणारे मिम्स सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहेत. या पोस्टच्या माध्यमातून स्मार्टरोडबाबत संताप व्यक्त होत आहे. नेटिझन्सनी फेसबूक, व्हॉटसअ‍ॅप आणि इन्स्टाग्रामवर या पोस्ट अपलोड केल्या आहेत.

त्यावर येणार्‍या प्रतिक्रियाही खूप तिखट आहेत. या मिम्स झपाट्याने सर्वत्र प्रसारीत झाल्या आहेत. नेटिझन्सनी उचललेल्या या पाऊलामुळे तरी प्रशासनाला जाग येईल का हा खरा प्रश्न आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *