पंचवटीत कौटुंबिक वादातून पत्नीची हत्या
स्थानिक बातम्या

पंचवटीत कौटुंबिक वादातून पत्नीची हत्या

Gokul Pawar

Gokul Pawar

पंचवटी : पंचवटी परिसरातील, गणेशवाडी, गाडगे महाराज पुलाजवळील मरी माता झोपडपट्टीत सोमवार (ता.९) रोजी रात्रीच्या सुमारास पतीने पत्नीचां गळा दाबून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून संशयित पतीस पोलिसांनी अटक केली आहे.
या प्रकरणी पोलीस हवालदार वणवे यांनी फिर्याद दिली आहे. मयत शिला विजू कामडी (वय.२९) ही पती विजू केशव कामडी व चार मुलांसमवेत पंचवटीतील गाडगे महाराज पुलाजवळील मरी माता झोपडपट्टीत राहत होती. दरम्यान सोमवार (ता.९) रोजी अकरा वाजेच्या सुमारास शीलाचे तिचा पती विजू कामडी बरोबर किरकोळ कारणावरून वाद झाला.
हा वाद वाढतच गेल्याने संतप्त झालेल्या विजूने पत्नी शीला हिस जबर मारहाण करीत तिचा गळा दाबून मारून टाकले. या घटनेनंतर विजू त्याच्या पत्नीची बहीण भारतीच्या घरी गेला. आणि शीलाला काहीतरी झाले असून ती उठत नसल्याची माहिती दिली. यानंतर भारती ही घरी गेली असता तिची बहीण मयत अवस्थेत दिसल्याने तिने पंचवटी पोलिसांना या बाबत माहिती दिली.
पोलिसांनी प्रारंभी अकस्मात मृत्यूची नोंद केल्यानंतर आज सकाळी शीलाच्या मृतदेहाचे शविच्छेदन केले असता यात शीलाचा गळा दाबून खून झाले असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करीत आहेत.
Deshdoot
www.deshdoot.com