शहरात रेल्वेखाली सापडून दोघांचा मृत्यू
स्थानिक बातम्या

शहरात रेल्वेखाली सापडून दोघांचा मृत्यू

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक। रेल्वे अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यातील एकाने आत्महत्या केल्याचे समोर येत आहे.

रेल्वेतून पडल्याने २० वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. शुक्रवारी (दि.६) सकाळच्या सुमारास एकलहरा परिसरातील रेल्वेमार्गावर हा प्रकार घडला. यात मृत्यू झालेल्या युवकाची ओळख पटलेली नाही. रेल्वेतून पडल्याने युवकास तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सैय्यद पिंप्री येथील रेल्वे रुळावर एकाने आत्महत्या केल्याचा प्रकार शुक्रवारी (दि.६) सायंकाळी उघडकीस आला. सखाराम पांडु भडांगे (57, रा. सैय्यद पिंप्री) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com