Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्याअत्यावश्यक सेवेसाठी नाशिकचे २१ एसटी कर्मचारी ठाणे विभागात सेवा बजावणार

अत्यावश्यक सेवेसाठी नाशिकचे २१ एसटी कर्मचारी ठाणे विभागात सेवा बजावणार

नाशिक | प्रतिनिधी

लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवेवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीची सोय काही शहरात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून केली जात आहे. या वाहतुकीत वाढ करण्याचे आदेश प्राप्त झाल्याने एसटी कर्मचारी अत्यावश्यक सेवेसाठी पुन्हा एकदा सज्ज झाले आहे.

- Advertisement -

मुंबई आणि लगतच्या परिसरात दररोज कोरोना बाधित आणि संशयित रुग्ण आढळून येत आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा पुरविण्याऱ्या यंत्रणेवर ताण पडत आहे. या सेवेतील कर्मचाऱ्यांची संख्या मोठी असल्याने त्यांची ने-आण करण्याची जबाबदारी एसटी महामंडळाने घेतली आहे.

एसटी प्रशासनाच्या मुंबई, ठाणे, पालघर विभागामार्फत अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी विशेष वाहतूक व्यवस्था करण्यात येत आहे. या सेवेत वाढ करण्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक विभागातील एकूण 21 चालक व वाहक या कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आले आहेत. हे कर्मचारी ठाणे विभागात पुढील काही दिवस सेवा बजाविणार आहे.

विभागातील कर्मचारी विशेष बसने ठाण्याकडे रवाना करण्यात अाले. दरम्यान, अत्यावश्यक सेवेसाठी जाणाऱ्या चालक-वाहकाच्या निवास आणि भोजनाची व्यवस्था एसटी महामंडळाकडून करण्यात आली आहे. नाशिक विभागातील कर्मचारी ठाणे आगार एक तर रायगड विभागातील कर्मचारी ठाणे आगार दोन येथे कर्त्याव्यावर राहणार आहेत.

अत्यावश्यक सेवेसाठी नाशिक विभागातील चालक-वाहकांना पाठविण्याच्या सूचना वरिष्ठ पातळीवरून आल्या होत्या. त्यानुसार निवडक कर्मचारी पाठविण्यात आले आहे. हा दैनंदिन कामकाजाचा भाग आहे.

-कैलास पाटील, विभागीय वाहतूक अधिकारी, नाशिक.

महामंडळाने आम्हा चालकांची जेवनाची व अन्य व्यवस्था केली आहे. सर्वच यंत्रणा काम करीत आहे. अशा प्रसंगात आपलेही कर्तव्य आहे, म्हणूण सेवा बजावत आहे. कुटुंबाची जबाबदारी माझ्यावर आहे, तु जे करशील तीच पूर्व दिशा अशी त्यांची धारणा आहे.

प्रतिक परदेशी, चालक तथा वाहक.

- Advertisment -

ताज्या बातम्या