Wednesday, April 24, 2024
Homeनाशिककामगारांना दिलासा : नाशिकमध्ये तीन हजार उद्योगांनी घेतली परवानगी; सोळाशे उद्योग सुरु

कामगारांना दिलासा : नाशिकमध्ये तीन हजार उद्योगांनी घेतली परवानगी; सोळाशे उद्योग सुरु

सातपूर | प्रतिनिधी

शासनाने उद्योगक्षेत्राला गती देण्याचे आदेश दिल्यानंतर सुमारे 3 हजार  ०२ उद्योगांनी उद्योग  सुरू करण्यासाठी परवानगी घेतली असून त्यापैकी सोळाशे उद्योगांनी कारखाने सुरु केले असल्याचे एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी यांनी सांगितले.

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपासून उद्योगक्षेत्र सुरु होणार की नाही. याबाबत सातत्याने  उलट सुलट चर्चा सुरू होत्या. शासनाच्या किचकट नियमावलीतुन मार्ग काढत उद्योग सुरू करण्याबाबत उद्योजकही संभ्रमावस्थेत होते.

त्याचवेळी दुसरीकडे उद्योग सुरू करण्याबाबतची परवानगी घेण्यासाठी ३ हजार ०२ उद्योगांनी ऑनलाइन मागणी नोंदवली होती. या सर्व उद्योगांना सेल्फ डीक्लरेशनवर परवानगी देण्यात आली असून यापैकी सोळाशे उद्योगांनी कारखाना सुरू करण्यासाठीची प्रक्रिया गतिमान केले आहेत.

422 वाहनांच्या परवानगी पासेस ही एमआयडीसीने दिले असल्याचे गवळी यांनी सांगितले. उद्योग सुरू करणाऱ्यांमध्ये  महिंद्रा, एबीबी, सिमेंस, सॅमसोनाईट, इप्काँस, टिकेइएस, जिंदल साँ, जिंदाल पॉलिमर यासह विविध मोठ्या उद्योगांनी उत्पादन प्रक्रियेची तयारी सूरु केली असून, मोठ्या उद्योगांनी उत्पादन सुरुवात केल्यास त्यामुळे छोट्या उद्योगांनाही काही प्रमाणात गती मिळण्याची शक्यता असल्याने या उद्योगांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

उद्योगांमध्ये शासनाने दिलेले निर्बंध पाळले जातात किंवा नाही याबाबत जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून पाहणी केली जात असून कामगार उपायुक्त व औद्योगिक सुरक्षा विभागातर्फे ही कामगारांच्या सुरक्षिततेच्या  उपाययोजनांबाबत कारखान्यांवर लक्ष दिले जात आहे.

सॅमसोनाईट उद्योगाच्या गोदामात मोठ्या प्रमाणात तयार माल आहे. उत्पादन प्रक्रिया सुरू करण्यासाठी कच्चा मालही उपलब्ध आहे.  पहिल्या टप्प्यात उद्योग क्षेत्राची साफसफाई  करण्यात वेळ जाणार आहेत.  त्यानंतर आगामी काळात बाजारातील मागणीची स्थिती लक्षात घेऊन उत्पादन प्रक्रियेला गती दिली जाणार आहे.

-वाय एम सिंग उपाध्यक्ष सॅमसोनाईट

- Advertisment -

ताज्या बातम्या