Video : ऐतिहासिक काळाराम मंदिरात श्री राम जन्मोत्सव साजरा; अवघे पाच पुजारी उपस्थित
स्थानिक बातम्या

Video : ऐतिहासिक काळाराम मंदिरात श्री राम जन्मोत्सव साजरा; अवघे पाच पुजारी उपस्थित

Dinesh Sonawane

पंचवटी | वार्ताहर

नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिरात रामजन्मोत्सव साजरा करण्यात आला. यंदाच्या उत्सवावर कोरोनाच संकट असल्याने अवघ्या पाच पुजारयांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. मंदिराच्या गाभाऱ्यात महंत सुधीर पुजारी, नरेश शास्त्री पुजारी यांनी यंदाचे उत्सवाचे मानकरी हर्षल बुवा पुजारी यांना उत्सवाची पूजा सांगितली.

यंदा पहिल्यांदाच उत्सवात मंदिराचे चारही दरवाजे बंद करण्यात आले होते. मंदिराच्या गेल्या साडेतीनशे वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच भाविकांविना उत्सव साजरा करण्यात आला.

मात्र अस असले तरी मंदिराच्या गर्भगृहात ढोल, झांज यांच्या तालावर आणि पुष्पांची उधळण करत उत्साहात रामजन्मोत्सव साजरा झाला. यावेळी मंदिराच्या बाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता.

पहाटे मानकरी हर्शल बुवा पुजारी यांच्या हस्ते सपत्नीक महापूजा पार पडली. त्यानंतर प्रभू रामचंद्रांना नवा पोशाख परिधान करण्यात आला. आज दुपारी बारा वाजेच्या ठोक्याला मानकर्यांच्या हस्ते विधिवत पूजा झाल्यानंतर श्री राम जन्मोत्सव साजरी झाला. यावेळी मंदिरात केवळ ट्रस्टचे धनंजय पुजारी, मंदार जानोरकर, अजय निकम, शुभम डंबाळे व महंत सुधीरदास पुजारी यांची उपस्थिती होती.

सालाबाद प्रमाणे सायंकाळी  मानकरी हर्शल बुवा पूजाधिकारी अन्न कोट नैवैद्य दाखवतील अशी माहिती देण्यात आली आहे. आजच्या राम जन्मोत्सावासाठी मंदिर परिसरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त होता तैनात होता. मंदिर प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने भाविकांना मंदिरात गर्दी न करण्याचे आवाहन करण्यात आले होते त्यानुसार नाशिककरांनी प्रतिसाद देत मंदिरान येणे टाळले.

Deshdoot
www.deshdoot.com