Friday, April 26, 2024
Homeनाशिकमानवतेचा हुंकार; सातपूर परिसरातील सामाजिक संस्थांकडून ५०० गरीब कुटुंबांना किरणा

मानवतेचा हुंकार; सातपूर परिसरातील सामाजिक संस्थांकडून ५०० गरीब कुटुंबांना किरणा

सातपूर | प्रतिनिधी
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लागु करण्यात आलेल्या संचारबंदी काळात  गोरगरीबांना जेवणाची भ्रांत राहु नये यासाठी सामाजिक बांधिलकीतून सातपूर परिसरातील निलधारा सोशल फाऊंडेशन, एल. एक्स. जी. बॉईज ग्रुप व आरंभ ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने परिसरातील 500 गरिब, गरजू कुटुंबांना मदतीचा हात पूढे केला आहे.
या प्रत्येक कुटुंबाला किमान १० दिवस पुरेल एवढा किराणा साहित्याचे व जीवनावश्यक साहित्याचे वाटप केले जाणार आहे. प्रत्येक कुटुंबाला आवश्यक तांदूळ, गव्हाचे पीठ, मीठ, तेल, हळद, मिरची, साबण, डाळ तसेच शिमला मिरची, कोबी जीवनावश्यक वस्तूंचे पॅकिंग करून सुमारे कुटुंबांपर्यंत पोहोचविले जाणार आहे.
पाकिटे सातपूर परिसर, फाळके परिसर, पाथर्डी फाटा जिथे गरज असेल अशा ठिकाणी पोहोचविण्याचे नियोजन करण्यात येत आहे.
सोशल फाऊंडेशन, एल. एक्स. जी. बॉईज ग्रुप आरंभ ग्रुपच्या सदस्यांनी मदतीसाठी केलेल्या आवाहनाला शहरातून उदंड प्रतिसाद मिळत आहे. आवाहनानंतर अवघ्या २४ तासांतच सुमारे १ लाख २५ हजार रुपये, तसेच वस्तूंच्या स्वरूपातही मदतीचा ओघ सुरू आहे.
आतापर्यंत सुमारे ४०० कुटुंबांना पुरेल एवढे पॅकिंग पूर्ण झाले आहेत. परिस्थिती बघता ही मदतही कमी पडणार असल्याने दानशूरांनी आपापल्या परीने मदत करावी, असे आवाहन आयोजक संस्थांचे अझहर शेख, हर्षल आहेर, मनोज तांबे, एजाज शेख, लोकेश कटारिया, भूषण निकम, नितीन भापकर, नॉडी कुलकर्णी, अजित सिंग, ज्ञानेश्वर वेळीस, नासिम अन्सारी, कामरान सिद्दीकी, नीलेश अहिरे, दौलत कुडी, संदीप तिवारी, कासिर इनामदार, चिराग महाले, लकी सिंग, हेमंत बोरसे, अतुल गहिवड, विवेक वडगे यांच्यासह ग्रुपचे सदस्यांनी केले आहे. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी परीसरातील युवक विशेष परिश्रम घेत आहेत.
- Advertisment -

ताज्या बातम्या