Friday, April 26, 2024
HomeनाशिकDeshdoot Impact : अवैध धंद्याबाबतचे वृत्त झळकताच पोलिसांचे ठिकठिकाणी छापे

Deshdoot Impact : अवैध धंद्याबाबतचे वृत्त झळकताच पोलिसांचे ठिकठिकाणी छापे

आहुर्ली | वार्ताहर

इगतपुरी तालुक्यातील शेवगेडांग गावात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरु होते. यामुळे त्रस्त झालेल्या महिला व नागरिकांनी अवैध धंद्यांच्या अड्ड्यावर धाडी टाकून रणरागिणी अड्डे उध्वस्थ केल्याचे वृत्त देशदूतमध्ये प्रकाशित झाले होते. यानंतर ग्रामीण पोलिसांनी तातडीने दखल घेत आज पहाटेच अवैध अड्ड्यांवर छापे टाकून धडक कारवाई केली. दरम्यान, या कारवाईमुळे पंचक्रोशीतील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

- Advertisement -

ईगतपुरी तालुक्यातील शेवगेडांग हे राजकीय दृष्टीने जागरुक व त्याच बरोबरीने अति संवेदनशील गाव म्हणून ओळखले जाते. या गावाच्या आजुबाजुला डोंगरदर्यात व दुर्गम भागात वसलेल्या अनेक वाड्या वस्त्या आहेत. या वस्त्यांवर अवैध धंदे मोठ्या प्रमाणात आहेत.

यामुळे पंचक्रोशीतील व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढले. अनेक युवकांचे अकाली निधनही झालीत. अनेकांचे संसार उधवस्त झाले आहेत. यामुळे  ज्यांनी गावातील हे धंदे रोखायला हवे तेच हे धंदे करत असल्याचे उघड झाले होते.

सततच्या त्रासाला कंटाळून परिसरातील महिला व युवकांनी एकत्र येत सदर अवैध धंदे चालकांवर व त्यांच्या अड्ड्यावर धाडी टाकून त्यांचे अड्डे उध्वस्त केले आहे. याबाबतचे वृत्त देशदूतमध्ये झळकले होते. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या पोलीस यंत्रणेने आज  पहाटे धडक कारवाई करत अवैध धंद्यांवर धाडी टाकल्या.

घोटी पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक जालिंदर पळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सुहास गोसावी, पो. हवा. धर्मराज पारधी, पो. कॉ. लहु सानप, पो. कॉ. गोविंद सदगीर, पो. कॉ. रमेश चव्हाण आदीचां सहभाग असलेल्या पोलीस पथकाने ही कारवाई केली असुन संबंधित अवैध धंदे चालकांवर गुन्हे दाखल करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

नागरिकानीं सहकार्य करावे 

शेवगेडांग परिसरात वाडी वस्तीवर दुर्गम व डोंगर दर्यात असणाऱ्या संशयास्पद ठिकाणावर धाडी टाकण्यात आल्या असुन संशयित अवैध धंदे चालकांवर कारवाई ची प्रक्रिया सुरू आहे. अवैध धंदयानां आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन कसोशीने प्रयत्न करत असुन या कामी स्थानिक नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे.

जालिंदर पळे, पोलिस निरीक्षक घोटी पोलीस स्टेशन

- Advertisment -

ताज्या बातम्या