घर भाड्याने देणे आहे? ‘या’ सहा गोष्टी लक्षात ठेवा

घर भाड्याने देणे आहे? ‘या’ सहा गोष्टी लक्षात ठेवा

नाशिक : अनेकदा लोक घाम गाळून कमविलेले पैसे घर घेण्यात घालवितात आणि पुढे जाऊन हेच घर भाड्याने देत असतात. परंतु अनेकवेळा अनेक घरमालक घर भाड्याने देण्यापूर्वी आवश्यक असलेल्या काही गोष्टींकडे लक्ष देत नाहीत. यामुळे नंतर तेच अडचणीत सापडतात. एका चुकीमुळे खूपमोठे नुकसान सहन करावे लागू शकते.तर अशावेळी पुढील सहा गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

घर भाड्याने देण्यापूर्वी घराची दुरुस्ती करवून घ्यावी. जेणेकरून भाडेकरूस आपण ज्या स्थितीत घर द्याल त्याचनुसार भाडेकरू तुम्हाला पैसे देणार. तसेच तो जातेवेळी त्याच स्थितीत घर ठेवेल. यामुळे तुमचे घरही सुरक्षित राहील अन घरभाडेही मिळेल.

भाडेकरूची पोलिस पडताळणी करणे आवश्यक आहे. तुम्ही वेबसाइट्सच्या माध्यमातूनही घर भाड्याने देऊ शकतात.

घर भाड्याने देतांना ओळखीच्या किंवा एजंटद्वारे द्या. एजंटकडे बर्‍याचदा ज्या लोकांना खरोखर घराची गरज असते, तेच जातात. तसेच एजंट काही कमिशन घेत असतात परंतु याबदल्यात कागदपत्रांची पूर्तता वेळीच करून देत असतात.

महत्वाचे म्हणजे घर भाड्याने ज्ञेयापूर्वी भाडेकरूस घराच्या देखभाल संबंधित सर्व गोष्टी तपशीलवार सांगणे आवश्यक आहे. जर आपले घर एखाद्या सोसायटीमध्ये असेल तर आपल्या भाडेकरूला सोसायटीच्या नियमांबद्दल लिखित माहिती द्या. घराची चावी देण्यापूर्वी सर्व गोष्टींची खात्री करुन घ्या. तुमची सोसायटी तुम्हाला ‘ना हरकत प्रमाणपत्र’ देत नसेल आणि तरीही तुम्ही तुमचं घर भाड्याने देत असाल तर सोसायटी तुमच्या आणि भाडेकरूविरुद्ध तक्रार करून कायदेशीर कारवाई करू शकते.

काहीवेळा भाडेकरू पटकन सापडत नाहीत, त्यामुळे भाडेकरू भेटण्यासाठी घरभाडे कमी केले जाते. घरात उपलब्ध असलेल्या सुविधांनुसार, वाजवी भाडे निश्चित करा. सध्या सुरू असलेल्या भाड्याची माहिती घेतल्यानंतर तुम्ही २ ते ५ टक्क्यांच्या फरकाने भाडे घेणे अधिक चांगले राहील.

जर आपण एखादे सुसज्ज किंवा अर्ध-सुसज्ज घर भाड्याने देत असाल तर आपल्या वस्तूची यादी तसेच सद्यस्थिती तपासून भाडेकरूला याबद्दल माहिती द्या. जेणेकरून घर खाली करण्याच्या वेळी कोणताही वाद उद्भवणार नाही.

घर भाड्याने देताना कायदेशीर औपचारिकतांकडे दुर्लक्ष करू नका. काळाचा त्रास सहन करावा लागतो. तोंडी आधारावर आपण भाडे करार करू नका हे महत्वाचे आहे. देशात 11 महिन्यांचा भाडे करार आहे. या कालावधीपेक्षा जास्तीत जास्त भाडे करार नोंदणी करणे बंधनकारक आहे. 12 महिन्यांच्या किंवा त्यापेक्षा अधिक भाड्याच्या करारामध्ये राज्य सरकार भाड्याचे दर ठरवते. भाडे करारात भाडेपट्टीची तारीख, सुरक्षा ठेव, देयकाची वेळ, भाड्याची शेवटची तारीख, उशीरा भाड्याचा दंड, बेदखल अटी व शर्तींचा समावेश असणे आवश्यक आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com