जुना कांदा खातोय भाव; नवा कांदा ५०, जुना १२० रूपये किलो
स्थानिक बातम्या

जुना कांदा खातोय भाव; नवा कांदा ५०, जुना १२० रूपये किलो

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक । कांद्याच्या दर गगनाला भिडले असून त्यांनी सामान्य जनतेच्या डोळ्यात पाणी आणले आहे. बाजारपेठेत जुना कादा 120 रूपये किलोने विकला जात आहे. त्या तुलनेत नवा कांदा 50 रूपये किलो असल्याने तो खरेदीकडे ग्राहकांचा जादा कल आहे. किमान एक महिना कांद्याचे दर चढे राहणार असल्याचा अंदाज व्यापार्‍यांनी वर्तविला आहे. चढ्या दरामुळे शेतकर्‍याच्या हातात जरी चार जादा पैसे खुळखुळणार असले तरी, सामान्य जनतेला कांद्याने रडविले आहे.

शहरातील भाजी मंडई, पेठरोड, गोदाघाट आणि रविवार कारंजा येथील भाजीपाला विक्रेत्यांकडे जुन्या कांद्याला 100 ते 120 रूपये किलोदराने भाव मिळाला आहे. नवा कांदा मात्र 50 ते 60 रूपये किलो विक्री होत असून येत्या काही दिवसांत कांद्याचे भाव आणखी वाढण्याची दाट शक्यता आहे.

दुसरीकडे भाजीपाल्याच्या दरातही घट आणि वाढ होत असून 20 रूपयांना मिळणारी कांद्याची पात 70 रूपयांना घ्यावी लागत आहे. मेथीदेखील 30 ते 40 रूपयांना मिळत आहे. एकीकडे कांद्याने डोळ्यात पांणी आणलेले असतांना दुसरीकडे भाजीपालाही भाव खात असल्याने सर्वसामान्य गृहिणींचे रोजचे बजेट कोलमडले आहे. बटाटे 25 रूपये किलो असून टमाट्याच्या भावात वाढ होण्याची शक्यता आहे.

असे आहेत भाज्यांचे दर

भाज्या भाव प्रति किलो
गवार १०० रूपये किलो
वांगे ८०
गिलके ६०  ते ८०
दोडके ६० ते ८०
टमाटे २०
मिरची ६०
काकडी ४०
भेंडी ६०
वटाणा ५०
वाल ६०

भाजीपाल्याचे भाव स्थिर असून त्यांचे भाव कमी जास्त होत असतात. जुना कांदा महाग झाला आहे. मागणी नेहमीप्रमाणे आहे.
-लोकेश शिरसाठ, भाजीविक्रेता

Deshdoot
www.deshdoot.com