आदिवासी विद्यार्थ्याना स्पर्धा परीक्षा साहित्य मिळणार; एक कोटीचा निधी मंजूर
स्थानिक बातम्या

आदिवासी विद्यार्थ्याना स्पर्धा परीक्षा साहित्य मिळणार; एक कोटीचा निधी मंजूर

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक । प्रतिनिधी

अतिमागास विद्यार्थ्यांचा स्पर्धा परीक्षेतील टक्का वाढावा यासाठी मानव विकास अभियांनातर्गत नाविन्यपूर्ण योजनेतून अतिमागास भागातील वाचनालयांना स्पर्धा परिक्षेची पाठयपुस्तके उपलब्ध करून देण्यात आली आहे. याकरीता 28 लाखांच्या निधीला मंजूरी देण्यात आली.

आदिवासी भागातील राहणीमान उंचावावे यासाठी मानव विकास मिशन अंतर्गत विविध योजना राबविल्या जातात.गर्भवती महीलांना बुडीत मजूरी, आरोग्य शिबीर,मुलींना शाळेत जाण्यासाठी सायकल वाटप, तसेच पाच किलोमीटर पेक्षा अधिक अंतरावरील शाळांमध्ये विद्यार्थी वाहतूकीसाठी बस सेवा आदी सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातात. नाशिक जिल्हयाला वर्षाला दोन कोटी रूपये निधी देण्यात येतो.

तसेच, जिल्हयात तीन प्रकारच्या योजना राबविण्यसासाठी एक कोटी रूपये मंजूर करण्यात आले आहे. त्याअंतर्गत स्पर्धा परिक्षांमध्ये आदिवासी भागातील विद्यार्थ्यांचेही प्रमाण वाढावे याकरीता आदिवासी भागातील ग्रंथालयांना 28 लाख रूपयांची स्पर्धा परिक्षा पुस्तके देण्यात आली आहेत.

त्याचप्रमाणे मधमाशा पालन हा उद्योग शेतीपुरक व्यवसाय आहे. शास्त्रोक्त पध्दतीने मधुमक्षिका पालनासाठी मार्गदर्शन मिळावे याकरीता खादी ग्रामोद्योग केंद्रामार्फत पेठ आणि त्र्यंंबक येथील 50 जणांची निवड करण्यात आली आहे. त्यांना मार्गदर्शनाबरोबरच किट उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

याकरीता 5 लाख रूपयांचा निधीही उपलब्ध करून देण्यात आला आहे. ग्रामीण भागात रूग्णालये, प्राथमिक आरोग्य सेवा केंद्रात वीज नसल्यास लस ठेवण्यासाठी अडचण निर्माण होते. काही लसी या थंड ठिकाणी ठेवेणे आवश्यक असते. याकरीता 64 प्राथमिक आरोग्य सेवा केंद्रे आणि 4 ग्रामीण रूग्णालयांमध्ये सोलर फ्रिजर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

मानव विकास कार्यक्रमांतर्गत जिल्ह्याला1 कोटी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यात स्पर्धा परिक्षा पुस्तके, मधुमक्षिका पालक मार्गदर्शन, आणि ग्रामीण रूग्णालयांसाठी सुविधा निर्माण करून देण्यात आल्या आहेत.

-हेमंत आहिरे, जिल्हा नियोजन अधिकारी, मानव विकास मिशन

Deshdoot
www.deshdoot.com