नेट परीक्षेची उत्तरतालिका जाहीर; अशी पहा Answer Key

नेट परीक्षेची उत्तरतालिका जाहीर; अशी पहा Answer Key

नाशिक : नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) च्या वतीने घेण्यात आलेल्या ‘नेट’ परीक्षेची उत्तरतालिका अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. देशातील दहा लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती.

दरम्यान नाशिक केंद्रावर ०२ डिसेंबर ते ०६ डिसेंबर या कालावधीत ही परीक्षा पार पडली होती. या परीक्षेच्या निकालाची तारीख ३१ डिसेंबर देण्यात आली असून आज परिक्षार्थींसाठी उत्तर तालिका जाहीर करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना ntanet.nic.in या वेबसाइटवर ‘View Question Pepar and challange provisional answer key ‘ या पर्यायावर क्लिक करा. अप्लिकेशन किंवा रोल नंबर, जन्मतारीख टाकून सबमिट म्हटल्यावर उत्तरतालिका बघता येणार आहे.

अशी पाहता येईल उत्तरतालिका :
⇒ सर्वप्रथम अधिकृत वेबसाईटवर (ntanet.nic.in) जावे.
⇒ होमपेजवर View question Pepar and challange provisional answer keyच्या लिंकवर क्लिक करावे.
⇒ त्यानंतर नवीन पेज उघडेल.
⇒ त्यानंतर प्रश्नपत्रिका आणि उत्तरतालिका डाउनलोड करावी.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com