जिल्हा परिषदांना निवृत्तीवेतन करण्यासाठी २८८ कोटी
स्थानिक बातम्या

जिल्हा परिषदांना निवृत्तीवेतन करण्यासाठी २८८ कोटी

Dinesh Sonawane

नाशिक । प्रतिनिधी

लॉकडाऊनमुळे राज्य सरकारच्या उत्पन्नाचे सर्वच स्त्रोत बंद पडल्यामुळे आर्थिक खर्चात काटकसर करण्याच्या सूचना सरकारने केल्या आहेत. मात्र, अनिवार्य खर्च म्हणून राज्यातील 34 जिल्हा परिषदेच्या निवृत्त सेवकांचे निवृत्ती वेतन देण्यासाठी ग्रामविकास विभागाने 287 कोटी 89 लाख रुपये जिल्हा परिषदांकडे वर्ग केले आहेत.

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील सेवकांचे जूनपर्यंत निवृत्तीवेतन देण्यासाठी हा निधी मिळाला आहे. नाशिक जिल्ह्यासाठी एक लाख 30 हजार 395 रुपये मिळाले आहेत.

मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांच्या अधिपत्याखाली हा निधी खर्च केला जाणार असून, अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीमध्ये संबंधीत जिल्हा परिषदांच्या मुख्य लेखा व वित्त अधिकार्‍यांच्या डीडीओ कोडवर ही रक्कम दिसणार आहे. तसेच मंजूर अनुदानापेक्षा जास्त खर्च होणार नाही, त्याचप्रमाणे काटकसरीचे पालन करण्याची सूचना शासनाने केल्या आहेत.

शासनाच्या सूचना

-जिल्हा परिषदांनी या अनुदानातून केलेल्या खर्चाची स्वतंत्र नोंद ठेवावी
-मंजूर प्रयोजनासाठीच हा निधी खर्च करावा
-आवश्यक असेल तेवढेच अनुदान कोषागारातून काढावे
-महालेखापालांना हा खर्च बघण्याचा अधिकार राहील
-देयके देताना सांकेतांक न चुकता वापरावा

जिल्हानिहाय मंजूर अनुदान

ठाणे-88 हजार 780
रायगड-65 हजार
रत्नागिरी-72 हजार
सिंधुदुर्ग-37 हजार 223
पालघर-61 हजार 358
पुणे-एक लाख 49 हजार 999
सातारा-एक लाख 20 हजार
सांगली-75 हजार
सोलापुर-एक लाख 10 हजार
कोल्हापुर-65 हजार
औरंगाबाद-एक लाख 48 हजार 512
परभणी-54 हजार
बीड-एक लाख 20 हजार
नांदेड-एक लाख 36 हजार 240
उस्मानाबाद-7 हजार 500
जालना-65 हजार
लातूर-75 हजार
हिंगोली-30 हजार 650
गोंदिया-43 हजार
वर्धा-62 हजार
नागपुर-90 हजार 152
भंडारा-55 हजार
चंद्रपुर-83 हजार 487
गडचिरोली-65 हजार
नाशिक-एक लाख 30 हजार 395
धुळे-82 हजार
जळगाव-एक लाख 70 हजार
अहमदनगर-एक लाख 10 हजार
नंदुरबार-52 हजार 800
अमरावती-90 हजार
अकोला-66 हजार 860
बुलढाणा-69 हजार
यवतमाळ-एक लाख 30 हजार
वाशिम-35 हजार

एकूण-28 कोटी 78 लाख 56 हजार रु. 

Deshdoot
www.deshdoot.com