नाशिकरोड : सिन्नर फाट्याजवळ अपघात; पत्नीचा दुर्दैवी मृत्यू; पती गंभीर
स्थानिक बातम्या

नाशिकरोड : सिन्नर फाट्याजवळ अपघात; पत्नीचा दुर्दैवी मृत्यू; पती गंभीर

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिकरोड | प्रतिनिधी

आज दुपारी नाशिक पुणे रोडवरील सिन्नर फाटा येथे झालेल्या अपघातात महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. पती पत्नी दुचाकीने प्रवास करत असताना चारचाकी वाहनाने दुचाकीला मागून दिलेल्या धडकेत पत्नीचा मृत्यू झाला आहे. तर पती गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अधिक माहिती अशी की,सिन्नर फाटा येथील उड्डाण पुलावरून नाशिकमधील नामांकित महाविद्यालयातील प्राध्यापक आणि त्यांच्या पत्नी दुचाकीने प्रवास करत होते. याच वेळी भरधाव अल्टो कारने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली. यामध्ये दुचाकीसह दोघेही खाली कोसळले. भरधाव कारचालक कार दामटवत अपघातग्रस्तांना सोडून फरार झाला.

अपघातात मयत पत्नीचे नाव नीता पागधरे असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त होत आहे. त्यांचे पती शहरातील नामांकित महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत असल्याचे समजते.

Deshdoot
www.deshdoot.com