नाशिक जि. प. च्या चार विषय समिती सभापतीपदी कोण?
स्थानिक बातम्या

नाशिक जि. प. च्या चार विषय समिती सभापतीपदी कोण?

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक । प्रतिनिधी

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीनंतर आज चार विषय समिती सभापतींसाठी निवडणूक पार पडली. यावेळी शिक्षण व आरोग्य सभापती सुरेखा दराडे यांची निवड करण्यात आली तर अर्थ व बांधकाम सभापती संजय बनकर यांची निवड झाली. तसेच मेंगाळ यांच्याकडे समाजकल्याण तर महिला व बालकल्याण सभापतीपदी अश्विनी आहेर विराजमान झाल्या.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्याक्षपदाची निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर चार विषय समिती सभापती निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या सदस्यांची रात्री उशीरा बैठक पार पडली.

दरम्यान, आज सकाळी 11 वाजता विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. निवडणूक अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांच्या अध्यक्षतेखाली ही विशेष सभा पार पडली.

या सभेत चार विषय समितीच्या सभापतींची निवड करण्यात आली. जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीची सत्ता आल्याने त्यानुसार कालपासून लॉबिंग सुरु होते.  आज झालेल्या विशेष सभेत समाजकल्याण तसेच महिला व बालकल्याण या दोन विषय समित्यांसह इतर दोन विषय समित्यांंची सभापतीची निवड झाली.

राष्ट्रवादीकडून बांधकाम समितीसाठी उपाध्यक्षपदाची संधी न मिळालेल्या संजय बनकर यांचे नाव आघाडीवर होते. बनकर येवल्याचे असल्याने त्यांना ही समिती मिळण्याची दाट शक्यता वर्तविली जात होती.  अखेर संजय बनकर यांच्यावर अर्थ व बांधकाम सभापतीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com