दोन लाखांपेक्षा अधिक कर्ज व नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी काय? जाणून घ्या सविस्तर

दोन लाखांपेक्षा अधिक कर्ज व नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी काय? जाणून घ्या सविस्तर

नाशिक | प्रतिनिधी 

महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीचा अहवाल येत्या १५ दिवसांत कॅबिनेटला दिला जाणार आहे. तसेच दोन लाखांपेक्षा अधिक कर्ज व नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी शासनस्तरावर महत्वाचा निर्णय घेतला जाणार आहे. याबाबतदेखील लवकरच पाठपुरावा करून नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ मिळवून दिला जाणार असल्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.

यावेळी भुसे म्हणाले की,  शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात ट्रान्सफॉर्मर उभे करणार असून  अखंडित वीजपुरवठा कसा दिला जाईल याकडे लक्ष देणार आहोत.

तसेच केळीला फळाचा दर्जा मिळवून देण्यासाठी प्रस्ताव दिला जाणार आहे. उत्तर महाराष्ट्रातील जळगावमध्ये केळीचे दर्जेदार उत्पादन घेतले जाते त्यादृष्टीने सर्वोतपरी प्रयत्न केले जाणार आहेत.

यासोबतच कोटेशन भरलेल्या शेतकऱ्यांना वीज कनेक्शन मिळालंच पाहिजे यादृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत. कर्जमाफी पुनर्रर्रचना अहवाल आल्यानंतर मुख्यमंत्र्यांना सादर केला जाणार असल्याचे याप्रसंगी सांगण्यात आले.

अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली २ लाख रुपये पेक्षा अधिक कर्ज आणि नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी शासनाने स्वतंत्र समिती स्थापन केली आहे.

ही समिती आपला अहवाल15 दिवसात सादर करेल. त्याचा निर्णय कॅबिनेट मध्ये होईल. त्या अनुषंगाने नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचा सकारात्मक विचार सरकार करत असल्याचे सांगण्यात आले आहे.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com