Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकगोदामाई खळाळली; गंगापूर, दारणा समूहातून ३ हजार दलघफ़ू आवर्तन

गोदामाई खळाळली; गंगापूर, दारणा समूहातून ३ हजार दलघफ़ू आवर्तन

नाशिक । प्रतिनिधी

शेतीसाठी सिंचन व पिण्यासाठी गोदावरी व दारणा समूहातून ३ हजार द.ल.घ.फू आवर्तन सोडण्यात आले आहे. पुढील १५ मे पर्यंत हे आवर्तन सोडले जाणार आहे. या मार्गावरील वीज पुरवठा खंडित केला जावा असे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. दरम्यान, आवर्तनामुळे गोदामाई खळखळली आहे.

- Advertisement -

उन्हामुळे नदी नाले आटले असून  शेतीसाठि व पिण्यासाठी पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले आहे. ते बघता पाटबंधारे विभागाकडून सिंचन व पिण्यासाठी बुधवारी रात्री  (दि. १५) आवर्तन सोडण्यात आले.

गोदावरी व दारणा समूहातून गोदावरी कालव्यावरील पाणी पुरवठा योजनांसाठी व सिंचनासाठी १२३५ दलघफ़ू व बिगर सिंचन आवर्तनासाठी १७६५ दलघफू असे एकूण ३ हजार दलघफू आवर्तन टप्प्याटप्याने सोडण्यात येत आहे.

आवर्तनासाठी संबधित गावातील वीज पुरवठा खंडित केला जावा. पाणी चोरी होउ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने भरारी पथके नेमले अाहेत. पाणी चोरल्यास संबधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या