Thursday, April 25, 2024
Homeनाशिकयापुर्वी लागू अटीशर्ती कायम; सलून, जीम बंदच राहणार; व्हायरल मॅसेजकडे दुर्लक्ष करा...

यापुर्वी लागू अटीशर्ती कायम; सलून, जीम बंदच राहणार; व्हायरल मॅसेजकडे दुर्लक्ष करा : जिल्हाधिकारी

file photo

नाशिक । प्रतिनिधी

- Advertisement -

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी बुधवारी (दि.२७) राज्यातील सर्व जिल्हाधिकार्‍यांची व्हिसीद्वारे बैठक घेऊन लाॅकडाउन शिथिलतेबाबत अधिकार दिले. त्यानंतर जिल्ह्यात सलून व स्पाॅ, जीम, बाजारपेठा सुरु होणार असे मॅसेज सोशल मीडियावर व्हायरल झाले. मात्र, जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी लाॅकडाऊनमध्ये कोणतिही शिथिलता दिली नसल्याचे स्पष्ट केले. व्हायरल झालेल्या मॅसेज नाशिक जिल्ह्यासाठी नसून यापुर्वी दिलेल्या अटीशर्तीनूसारच सर्व व्यवहार सुरु राहतील, असे सांगितले.

जिल्हाधिकार्‍यांच्या नावाने व्हायरल झालेल्या मॅसेजमध्ये टॅक्सी व रिक्षा सेवा, सर्व दुकाने खुली करावी, शासकिय कार्यालयात शंभर टक्के उपस्थिती बंधनकारक, व्यायामशाळा बंद पण शाररिक अंतर राखून व्यायामास परवानगी, शीत पेय, चहा टपरी, पान ठेले सुरु करण्यास परवानगी देण्यात आली होती.

कापड व रेडिमेड दुकाने, चप्पल बूट, ज्वेलर्स सुरू करण्यास परवानगी देण्यात आली होती. शिवाय सलून सुरु करण्यास परवानगी. ग्राहकाने स्व:ताचा टाॅवेल, नॅपकिन सोबत बाळगावे ही अट होती. खासगी कार्यालये, कृषी निगडित दुकाने हि सुरु करण्यास मुभा. दुकानदारांनी नियमाचे उल्लंघन केल्यास पाच हजार रुपये दंड आकारला जाईल असा मॅसेज व्हायरल झाला होता.

त्यामुळे वरील विषयाशी निगडित दुकानदार, व्यावसायिक यांच्यामध्ये संभ्रमवस्था पहायला मिळाली. ते बघता जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी हा व्हायरल मॅसेज खोटा असून अशी अटिशर्तींमध्ये शिथिलता देण्यात आले नसल्याचे स्पष्ट केले.

व्हायरल मॅसेज जिल्हाधिकारी कार्यालयाने दिलेला नाही

आपण यापूर्वी अधिसूचनांमध्ये सविस्तर सूचना दिल्या आहेत. त्या सर्व सूचना कायम आहेत. त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. हा मॅसेज नाशिक पुरता दुर्लक्षित करावा.

– सूरज मांढरे , जिल्हाधिकारी

- Advertisment -

ताज्या बातम्या