दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण; अवघ्या दोन तासांत इंदिरानगर पोलिसांनी काढले शोधून
स्थानिक बातम्या

दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण; अवघ्या दोन तासांत इंदिरानगर पोलिसांनी काढले शोधून

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

इंदिरानगर | वार्ताहर

दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण झाल्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या दोन तासात अल्पवयीन मुलींना इंदिरानगर पोलिसांनी शोधून काढत घरच्यांच्या हवाले केले. या प्रकारानंतर इंदिरानगर पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक केले जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदिरानगर पोलीस ठाण्यात आज (दि.२३) रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास राजीव नगर परिसरातील एका महिलेने पोलीस ठाण्यात आपल्या दोन्ही मुलींचे अपहरण झाल्याची तक्रार दाखल केली होती.

त्यांच्या दोन अल्पवयीन मुली मेडिकल मध्ये डोक्याची गोळी आणण्यास पाठवले असता त्या रात्र भर घरी आल्या नाहीत. त्यांना कोणीतरी फूस लावून पळवून नेल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

दरम्यान, इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर यांनी त्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक बाकले पोलीस नाईक सावंत पोलीस नाईक पटेल, पोलीस नाईक ठाकरे, पोलीस नाईक राऊत गुन्हे शोध पथकाचे पोलिस उपनिरीक्षक सतिष जगदाळे यांना रवाना केले.

पोलिसांनी तपासाची सूत्रे फिरवून अवघ्या दोन तासात दोन्ही अल्पवयीन मुली यांना शरयू नगरी येथून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता मित्र मैत्रिणी वाढदिवस साजरा करण्यासाठी एकत्र आलो त्यातून घरी जाण्यास उशीर झाल्याने घरचे रागावतील या भीतीपोटी घरी गेलो नसल्याचे या मुलींनी सांगितले.  यानंतर  या मुलींसह पालकांचे समुपदेशन करून त्यांना घरी सुखरूप पाठविण्यात आले.

Deshdoot
www.deshdoot.com