…तर ‘पुन्हा टाळेबंदी’; मुख्यमंत्र्याचे सूतोवाच!
स्थानिक बातम्या

…तर ‘पुन्हा टाळेबंदी’; मुख्यमंत्र्याचे सूतोवाच!

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

मुंबई  | महाराष्ट्रात पुनश्च हरिओम करण्यात आले आहे. मिशन बिगीन अगेन या नावाने अनेक गोष्टींमध्ये सूट देण्यात आली आहे. अनेक नियम शिथिल करण्यात आले आहेत.

मात्र, सध्या रस्त्यांवर, बाजारात लोकांची मोठी गर्दी होताना दिसतेय. त्यामुळे गर्दी झाली तर पुन्हा एकदा नाईलाजाने टाळेबंदी करण्याची वेळ येऊ शकते, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.

टाळेबंदी हळूहळू उठवण्यात येणार आहे. परंतु संकट अजूनही टळले नाही. त्यामुळे विनाकारण गर्दी करु नका. मॉर्निंग वॉकसाठी गर्दी करु नका.

गर्दी होणार नाही याबाबत सर्वांनी काळजी घेणे महत्त्वाचे आहे. कुठेही गर्दी होता कामा नये, असे मुख्यमंत्री म्हणाले. ते म्हणाले , महाराष्ट्रातील जनता सरकारचे ऐकते, सरकार जनतेसाठीच ही पावले उचलत असल्याचे लोक जाणतात.

आतापर्यंत लोकांनी सहकार्य केले आहे. यापुढे देखील जनता सरकारच्या सर्व सूचनांचे पालन करेल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.

Deshdoot
www.deshdoot.com