Video : येवल्यातील देशमानेत बर्निंग कारचा थरार
स्थानिक बातम्या

Video : येवल्यातील देशमानेत बर्निंग कारचा थरार

Dinesh Sonawane

नाशिक | प्रतिनिधी

येवला तालुक्यातील देशमाने शिवारात अज्ञातांनी एक महागडी कार पेटवून दिल्याची घटना घडली. आज पहाटेच्या सुमारास कारमध्ये गाय आणि बैल बेशुद्ध करून चोरटी वाहतूक केली जात असल्याचे समजले. त्यानुसार स्थानिकांनी कार पकडून गाय आणि बैलाचे प्राण वाचवले.

घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली; घटनेची गांभीर्यता लक्षात घेऊन घटनास्थळी पोलीस पोहोचले. मात्र, पोलीस यंत्रणा घटनास्थळावरून परतल्यानंतर काही वेळाने अज्ञातांनी रस्त्याच्या कडेला उभी असलेली ही कार पेटवून दिली.

या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण पसरले होते.  या कारमध्ये दोन गायी आणि बैलाला बेशुद्ध करून गाडीत कोंबून चोरून नेले जात असल्याची माहिती प्रतिनिधीकडून देण्यात आली.

Deshdoot
www.deshdoot.com