Saturday, April 27, 2024
Homeनाशिकग्रुप ऍडमिन सावधान! अफवा पसरविल्यास खावी लागेल जेलची हवा

ग्रुप ऍडमिन सावधान! अफवा पसरविल्यास खावी लागेल जेलची हवा

नाशिक | प्रतिनिधी 

संपूर्ण देशासह जगात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. यापार्श्वभूमीवर सोशल मीडियातून अफवांचे पिक सध्या जोरदार बहरले आहे. यावर अंकुश ठेवण्यासाठी नाशिक पोलिसांनी येत्या ३० एप्रील पर्यंत १४४ (१) (३) लागू केले आहे. पोलिसांची नजर आपल्या ग्रुपमध्ये असणार आहे तर विनाकारण भटकंती, सामाजिक अंतर न ठेवणे, सार्वजनिक ठिकाणी गर्दी केल्यास थेट जेलची हवा खावी लागणार आहे.

- Advertisement -

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सध्या दहशतीचे वातावरण आहे. प्रत्येकाच्या तोंडून कोरोना शब्द निघाल्याशिवाय राहत नाहीये. देशात २१ दिवसांची संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

यापार्श्वभूमीवर नाशिक शहरातदेखील जमावबंदीचे आदेश काढण्यात आले होते. याकाळात अत्यावश्यक सेवा सुरु असल्याने कुठले ना कुठले नाव करून अनेकांनी विनाकारण भटकंती शहरात केलेली दिसून येत आहे.

दुसरीकडे अनेकजण ठिकाणी गर्दी करताना नजरेस पडत आहेत. तर काही रिकामटेकडे वेळ जात नाही म्हणून सोशल मिडीयावर अफवा पसरविताना दिसून येतात.

सोशल मीडियाच्या माध्यमातून चुकीचे संदेश, अफवांमुळे सामाजिक शांतता व सुव्यवस्था धोक्यात येण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे धार्मिक तेढ, अनधिकृत वा खोट्या बातम्या प्रसारीत करणे, सोशल मीडियाच्या व्हॉटस्‌ऍप, फेसबुक, व्टिटर, टिकटॉक, टेलीग्राम यावरून धार्मिक तेढ निर्माण करणारे आक्षेपार्ह पोस्ट शेअर न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

असे करताना जो आढळून येईल त्याच्यावर कारवाई होणार आहे. नाशिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या 30 एप्रिलपर्यंत कलम 144 (1)(3) लागू करण्यात आले आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई होईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या