१५८७ परप्रांतियांना घेऊन सहावी श्रमिक रेल्वे नाशिकरोडहून बिहारकडे रवाना

१५८७ परप्रांतियांना घेऊन सहावी श्रमिक रेल्वे नाशिकरोडहून बिहारकडे रवाना

नाशिक | प्रतिनिधी 

आज दुपारी नाशिक ते बिहारमधील हाजीपुर येथे आज विशेष श्रमिक रेल्वेने १५८५ परप्रांतीय आज नाशिकरोडहून रवाना झाले. यावेळी नाशिक जिल्हा प्रशासाच्या अधिकाऱ्यांनी रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी परप्रांतीयांना जेवण व  पाण्याच्या बाटल्या देण्यात आल्या.

सुरुवातीला संपूर्ण रेल्वे निर्जंतुक करण्यात आली. त्यांतर नागरिकांना सावधानतेच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या. दुपारी बरोबर दोन वाजेच्यास सुमारास या रेल्वेने बिहारकडे प्रयाण केले.

आतापर्यंत नाशिक मधून जवळपास पाच ट्रेन सोडण्यात आल्या आहेत. आजची सहावी ट्रेन तब्बल ११ लाख रुपयांचे परप्रांतीयांचे तिकिटे काढून रेल्वे रवाना करण्यात आली.

आज बिहारला रेल्वेच्या माध्यमातून पाठविण्यात आलेले नागरीक नाशिक जिल्ह्यातील विविध तालुक्यातील होते. तहसीलदारांच्या माध्यमातून या सर्वांना बसने रेल्वे स्टेशन परिसरात आणण्यात आले होते. त्यानंतर त्यांना तिकिटाचे वितरण करून बिहारला पाठ्विण्यात आले.

आज नाशिकमधून ६ वी रेल्वे बिहार राज्यातील हाजीपुर येथे १५८७ लोकांना घेऊन रेल्वे रवाना झाली असून या रेल्वेच्या तिकिटांचे सुमारे ११ लाख रूपयांची तिकिटे महाराष्ट्र शासनाने काढून या परप्रांतीयांना रवाना केले.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com