नाशिक : कपडे धुण्यासाठी गेलेल्या मुलीचा बुडून मृत्यू; मैत्रिणीला वाचविण्यात यश
स्थानिक बातम्या

नाशिक : कपडे धुण्यासाठी गेलेल्या मुलीचा बुडून मृत्यू; मैत्रिणीला वाचविण्यात यश

Dinesh Sonawane

नाशिक | प्रतिनिधी 

नाशिकरोड परिसरातील चांदगिरी गावाजवळील तलावानजीक धुणे धुण्यासाठी गेलेल्या १७ वर्षीय मुलीचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. तर ग्रामस्थांच्या प्रसंगावधनाने दुसऱ्या मुलीचा जीव वाचविण्यात यश आले आहे.

अधिक माहिती अशी की, आज सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास चांदगिरी येथील आकांशा दिलीप बागुल (वय १७) हि तिच्या मैत्रिणीसोबत गावातील तलावाच्या काठावर धुणे धुण्यासाठी गेली होती.

आकांक्षाचा पाय घसरल्याने ती पाण्यात बुडायला लागल्याचे तिच्या मैत्रिणीच्या लक्षात आले. तिने वाचविण्यासाठी पाण्यात उडी घेतली. पण दोघांना पोहोता येत नसल्याने पाण्यात दोघी बुडू लागल्या.

यादरम्यान, गावातील काही ग्रामस्थांनी मुलींना वाचविण्यासाठी पाण्यात उड्या मारल्या. यानंतर, काही वेळाने दोघींना पाण्याबाहेर काढण्यात आले.  गावक-यांनी पोलीसपाटलांच्या मदतीने तत्काळ दोघी मुलींना उपचारासाठी नाशिकरोड येथील बिटको रुग्णालयात दाखल केले, मात्र डाॅक्टरांनी आकांशाला मृत घोषित केले. नाशिकरोड पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर आकांक्षाच्या मैत्रिणीची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.

Deshdoot
www.deshdoot.com