Video : नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा; ऋषभ कंपनीची उत्पादने अमेरिकेत अंतराळ मोहिमेसाठी वापरणार
स्थानिक बातम्या

Video : नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा; ऋषभ कंपनीची उत्पादने अमेरिकेत अंतराळ मोहिमेसाठी वापरणार

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

सातपूर | प्रतिनिधी 

नाशिकच्या ऋषभ इन्स्ट्रुमेंटच्या कल्पकतेतून तंत्रज्ञान क्षेत्रात गरुड भरारी घेत जागतिक स्तरावर आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.  रिषभने आता जगातच नव्हे तर अंतराळातील तंत्रज्ञानातही आपले वर्चस्व सिद्ध करून जागतिक स्तरावर नाशिकसह देशाचे नाव सातासमुद्रापार पोहोचवले आहे.  मेड इन इंडियाला झळाळी यामुळे खऱ्या अर्थाने मिळाली आहे. यामुळे नाशिकच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

अंतराळात झेप घेणाऱ्या यानांना  तांत्रिक सहकार्य करण्यासाठी  आता ऋषभ इन्स्ट्रुमेंटसचे मीटर वापरले जाणार आहेत. जमिनीवरून आकाशात झेप घेतलेले यान पुन्हा जमिनीवर परत येईपर्यंत हे यंत्रे विविध प्रकारे मदत करणार आहेत. नुकतेच त्यांनी निर्मिती केलेली यंत्रणा स्पेस शटलमध्ये बसविण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली आहे.

नाशिकच्या ऋषभइन्स्ट्रुमेंट या उद्योगांमध्ये मागील पाच वर्षांपासून यावर काम केले जात होते. मागील दोन वर्षात ही यंत्र तपासणी प्रक्रियेत होती. तापमान गती क्षमता व कंपनात होणारे बदल सहन करण्याची क्षमता या यंत्रात आहे.

नाशिकला या यंत्रणेची आंतरराष्ट्रीय गुणवत्ता  तपासण्यासाठी ईएमआय ईएमसी प्रयोगशाळा उभारुन त्यात सखोल अभ्यास केल्यानंतर त्याची गुणवत्ता अंतराळ तज्ञांच्या माध्यमातुन तपासून घेतल्या. त्यानंतर या यंत्रणा स्पेस शटल मध्ये बसविण्याचा निर्णय झाला.

प्रत्यक्षात अमेरिकेमध्ये हे यंत्र बनवणारे अनेक उद्योग आहेत, मात्र तांत्रिकदृष्ट्या त्यांनाही मात देत ऋषभइन्स्ट्रुमेंट ने आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. पहिल्या टप्प्यात 12 मीटरची ऑर्डर मिळालेली आहे. याची संख्या आणखी वाढणार असून त्यानुसार व्याप्ती वाढण्याची शक्यता वर्तविली जाते आहे.

पँशन व पेशन्स गरजेचे

हे उत्पादन  म्हणजे नफा देणारे उत्पादन नसून  आपल्याला ते निर्माण करण्याची आवड असल्याने साकार झालेले आहे. कष्ट करत राहिले पाहिजे केव्हातरी फळ मिळते. कोणतेही काम करताना संयम असला पाहिजे. हे उत्पादन आत्माभिमानाचे उत्पादन आहे. अंतराळ यानामध्ये  टू वे कम्युनिकेशन करणाारी ही अद्यायावत यंत्रणा आहे. अंतराळ यानाच्या तंत्रज्ञानात ऋषभचे योगदान छोटे  असले तरी या इतिहासाचा आपण एक भाग आहोत याचा अभिमान आहे. मानवजातीसाठीच्या संशोधनात एक नवीन अध्याय असून त्यासाठी आपलाही खारीचा वाटा  आहे ही समाधानाची बाब आहे.

– नरेंद्र गोलीया
 व्यवस्थापकीय संचालक व अध्यक्ष  ऋषभइन्स्ट्रुमेंट

Deshdoot
www.deshdoot.com