नाशिक शहरातील ‘या’ ठिकाणच्या प्रतिबंधित क्षेत्रातील निर्बंध हटवले
स्थानिक बातम्या

नाशिक शहरातील ‘या’ ठिकाणच्या प्रतिबंधित क्षेत्रातील निर्बंध हटवले

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक जिल्ह्यातील करोना रुग्णांचा वाढता आकडा चिंतेचा विषय बनलेला असतांनाच शुक्रवारी (दि.22) शहरातील सातपूर विभागात असलेल्या सुप्रभात वसाहत रामकृष्णनगर संजीवनगर, मोठा राजवाडा नाशिक, नाईकवाडीपुरा, शिवाजीनगर भारतनगर व पंचवटीतील राठी संकुल असे पाच नवीन प्रतिबंधीत क्षेत्र आयुक्तांनी जाहीर केल्याने आता एकुण प्रतिबंधीत क्षेत्रातील संख्या 20 इतकी आहे. दरम्यान शुक्रवारी 6 प्रतिबंधीत क्षेत्रावरील निर्बंध आयुक्तांनी हटविले.

महापालिका आयुक्तांनी शहरात दि. 6 एप्रिल रोजी गोंविंदगर भागात पहिला करोना रुग्ण आढळल्यानंतर हा पहिला भाग प्रतिबंधीत क्षेत्र म्हणुन जाहीर केला होता. नंतर नवश्या गणपती गंगापूररोड परिसरात, नाशिकरोड धोंगडेनगर , समाज कल्याण विभाग वसतीगृह अशाप्रकारे दि. 19 मेपर्यत शहरात 35 प्रतिबंधीत क्षेत्र आयुक्तांनी जाहीर केले होते.

यातील 13 प्रतिबंधीत क्षेत्रात नवीन रुग्ण आढळुन न आल्याने आणि बाधीत व्यक्ती बरी झाल्यानंतर आयुक्तांनी या प्रतिबंधीत क्षेत्रातील निर्बंध हटविले होते. यानंतर करोना रुग्ण आढळून आल्यानंतर गुरुवारी (दि.21) रोजी सुप्रभात वसाहत रामकृष्णनगर संजीवनगर सातपूर, मोठा राजवाडा नाशिक, नाईकवाडीपुरा, शिवाजीनगर भारतनगर व पंचवटीतील राठी संकुल असे भाग प्रतिबंधीत क्षेत्र जाहीर करण्यात आले आहे. तसेच आयुक्तांनी हनुमान चौक नवीन नाशिक, जाधव संकुल, पाटीलनगर नवीन नाशिक, बजरंगवाडी नवीन नाशिक, हिरावाडी पंचवटी व श्रीकृष्णनगर सातपूर असे सहा प्रतिबंधीत क्षेत्रावरील निर्बंध आयुक्तांनी मागे घेतले.

या भागातील चौदा दिवसात कोणताही रुग्ण आढळून न आल्याने हे निर्बंध मागे घेण्यात आले आहे. नवीन प्रतिबंधीत क्षेत्रात या भागात वैद्यकिय पथकांकडुन घरोघरी सर्वेक्षणाचे काम महापालिका प्रशासनाकडुन सुरू करण्यात आले आहे.

तसेच शहरात गुरुवारी रात्री आलेल्या अहवालात 12 बाधीत रुग्णांपैकी 5 रुग्ण हे शहरातील असुन उर्वरित 7 रुग्ण शहराबाहेरील होते. यानुसार महापालिका आयुक्तांकडुन मोठा राजवाडा नाशिक, नाईकवाडीपुरा व शिवाजीनगर वडाळा पाथर्डीरोड असे तीन भाग प्रतिबंधीत क्षेत्र म्हणुन जाहीर करण्यात आले होते. शुक्रवारी (दि.22) रोजी रात्री शहरात 11 रुग्ण आढळून आले आणि आज (दि.23) रोजी दुपारी 2 रुग्ण आढळून आल्याने शहरात नव्याने दोन प्रतिबंधीत क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे.

Deshdoot
www.deshdoot.com