अल्पवयीन मुलीवर दोघांकडून अत्याचार; मुलगी गर्भवती राहिल्यानंतर प्रकार उघडकीस
स्थानिक बातम्या

अल्पवयीन मुलीवर दोघांकडून अत्याचार; मुलगी गर्भवती राहिल्यानंतर प्रकार उघडकीस

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक | प्रतिनिधी

सातपूरमधील शिवाजीनगर येथे राहणार्‍या मुलीवर दोघांनी जबरदस्तीने अत्याचार केल्याने मुलगी गर्भवती राहिल्याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

या अत्याचाराची अधिक माहिती अशी, की सातपूरमधील शिवाजीनगर येथील कृष्ण मंदिराच्या पाठीमागे असलेल्या संजीवनी दवाखान्याजवळ राहणार्‍या मुलीवर वसंत गांगुर्डे व हरिदास राऊत ऊर्फ सोनू या दोघांनी अल्पवयीन मुलीवर अत्याचार केले.

अत्याचार केल्याचे कोणाला सांगितले तर चाकूने ठार करू अशी धमकीही या दोघांनी दिली. अत्याचार झाल्यानंतरही मुलगी भीतीमुळे गप्प होती.

या मुलीला पाच महिन्यांची गर्भधारणा झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात बाललैंगिक अत्याचार संरक्षण (पोक्सो) अन्वये गुन्हा दाखल झाला असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक सूर्यवंशी अधिक तपास करीत आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com