अल्पवयीन मुलीवर अत्याचार; मोहाडीत संताप
स्थानिक बातम्या

अल्पवयीन मुलीवर अत्याचार; मोहाडीत संताप

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

जानोरी। वार्ताहर

दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथे सहा वर्षीय अल्पवयीन बालिकेवर अत्याचार झाल्याची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. आई, वडील घरी नसताना बालिका घरी खेळत होती. तिला एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलाने खेळण्याच्या बहाण्याने घरात बोलावून तिच्यावर अत्याचार केला.

दरम्यान, सायंकाळी आई, वडील घरी आल्यानंतर मुलीला रक्तस्त्राव होत असल्याने तिला आईने कारण विचारले असता तिने घडलेला प्रसंग सांगितला.

या घटनेची माहिती मिळताच या कुटुंबियांनी दिंडोरी पोलीस स्टेशनला धाव घेतली. संबंधित अल्पवयीन मुलावर कारवाई करण्याची मागणी केली. त्यानुसार रात्री उशिरापर्यंत दिंडोरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

याप्रकरणी अधिक तपास दिंडोरी पोलीस निरीक्षक अनिलकुमार बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कल्पेशकुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अरुण आव्हाड, दिलीप पगार, जाधव, युवराज खांडवी करीत आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com