उत्तर महाराष्ट्र तापला, पारा ४४ अंशांवर; पावसाची शक्यता
स्थानिक बातम्या

उत्तर महाराष्ट्र तापला, पारा ४४ अंशांवर; पावसाची शक्यता

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक । प्रतिनिधी

राज्यात गेल्या तीन चार दिवसात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत वाढ झाली असल्याने करोनाच्या लॉकडाऊनमुळे घरात बसलेल्या नागरिकांना घरातही उन्हाचा चटका बसु लागला आहे. राज्यात या वाढलेल्या तापमानामुळे अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता पुणे बेधशाळेने वर्तविली असुन पुढच्या चार दिवसात विजेच्या कडकडाटासह आणि वादळ वार्‍यासह पाऊसांची शक्यता आहे. दरम्यान उत्तर महाराष्ट्रात कमाल तपामानात सरासरीच्या तुलनेत लक्षणिय वाढ झाली असुन पारा 44 च्यावर गेला असुन करोनाच्या संकटातबरोबर आता उन्हाचा चटका बसु लागला आहे.

राज्यात गेल्या पाच सहा दिवसात कमाल तापमानात लक्षणिय अशी वाढ होत सर्वच भाग तापला आहे. राज्यातील जनता करोनाचा प्रादुर्भाव रोकण्यासाठी नागरिक घरात बंदीस्त असतांनाच वाढत असलेल्या तापमानामुळे नागरिकांना मोठा उकाडा सहन करावा लागत आहे. या वाढत असलेल्या तापमानामुळे मागील पंधरवाड्यात विदर्भात अनेक भागात अवकाळी पाऊस होऊन शेतीमालाचे नुकसान झाले होते.

या वाढत असलेल्या तापमानाची मोठी झळ विदर्भ व मराठवाड्याला बसत असतांना आता उत्तर महाराष्ट्रातील पारा 44 अंशावर गेला आहे. नाशिक मालेगांव, जळगांव भागात दुपारचे घराबाहेर पडणे अवघड झाले आहे. आता पुन्हा उद्या (दि.8) पासुन ते 11 मे पर्यत राज्यात मध्य महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाडा आदी भागात ठराविक ठिकाणी मेघगर्जनेसह, विजेच्या कडकडाट, सुसाट्याच्या वार्‍यासह पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.

आज राज्यात सर्वाधिक तापमान उत्तर महाराष्ट्रातील मालेगांवला 44.8 अंश सेल्सीअस असे नोंदविले गेले. तर नाशिकचा पारा 38.8 वर गेला आहे. मागील आठवड्यात नाशिक शहरात सुमारे पाऊण तास पाऊस झाला होता. आता देखील वाढत असलेल्या तापमानामुळे पाऊसाचे वातावरण तयार झाले आहे.

राज्यात सर्वात जास्त कमाल तापमानाची नोंद मालेगांवला झाली आहे. त्या खालोखाल अकोला 44,2 अंश, जळगांव व सोलापूर 43.6, नांदेड 43.5, परभणी 43.7, अमरावती व नागपुर 42.2, औरंगाबाद 41.4, बुलढाणा 41.5, पुणे 40.4, गोदिया 40.5, कोल्हापूर 39.6 व नाशिक 38.8 अशा कमाल तापमानाची आज नोंद झाली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com