Video : एसटीला दुय्यम स्थान देऊ नका; मृतांच्या नातेवाईकास सरकारी नोकरीत सामावून घ्या
स्थानिक बातम्या

Video : एसटीला दुय्यम स्थान देऊ नका; मृतांच्या नातेवाईकास सरकारी नोकरीत सामावून घ्या

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांची मागणी

नाशिक | प्रतिनिधी 

गेल्या सरकारच्या काळात एसटी महामंडळात अमुलाग्र बदल घडवून आणले गेले. या सरकारनेदेखील एसटीला दुय्यम स्थान न देता एसटीत सुधार आणला पाहिजे अशी प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिली. ते आज नाशिक जिल्ह्यातील व देवळा तालुक्यातील मेशी येथे काल (दि.२८) झालेल्या बस आणि रिक्षाच्या भीषण अपघाताची पाहणी करण्यासाठी आलेले होते. यावेळी ते  माध्यमांशी बोलत होते.

ते म्हणाले, चांगल्या ला चांगलं म्हटलं गेलं पाहिजे. गेल्या आमच्या सरकारच्या काळात राज्य परिवहन मंत्री असलेले दिवाकर रावते यांनी एसटीत अमुलाग्र बदल केले. प्रवाशांची काळजी आणि सुरक्षेवर अधिक लक्ष दिले होते. त्याच्या प्रयत्नांनी एसटीत सकारात्मक बदल झाले.

सर्वसामान्यांची जीवनवाहिनी असलेल्या एसटीला दुय्यम स्थान न देता एसटी प्रथमस्थानी आली पाहिजे. या सरकारने एसटीसह प्रवाशांची सुरक्षा जपली पाहिजे असेही ते म्हणाले.

दरेकर यांनी देवळा, उमराणे येथील रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांची विचारपूसदेखील केली. तसेच मालेगाव येथे काही रुग्णांवर उपचार सुरु आहेत त्यांच्या प्रकृतीची पाहणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

सर्वसामान्य प्रवासी एसटीतूनच प्रवास करतात. त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी पूर्णपणे शासनाची आहे. एसटीचे गेल्या काही दिवसांत अपघात वाढले आहेत. त्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. एसटी विकासाचा रोडमॅप तयार करून विकासाची शिखरं गाठली गेली पाहिजेत असेही त्यांनी सांगितले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com