सिरीन मेडोज परिसरात बिबट्याचा संचार?; परिसरात खळबळ
स्थानिक बातम्या

सिरीन मेडोज परिसरात बिबट्याचा संचार?; परिसरात खळबळ

Dinesh Sonawane

नाशिक | प्रतिनिधी 

गंगापूर रोड येथील सिरीन मेडोज परिसरात बिबट्याचे दर्शन झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. येथील एका व्यक्तीला रात्रीच्या सुमारास बिबट्या दिसून आला. त्यानंतर सोशल मीडियात याबाबतची माहिती पसरल्याचे परिसरातील एका नागरिकाने देशदूतशी बोलताना सांगितले.

येथून जवळच असलेल्या सावरकर नगर परिसरात गेल्या वर्षी बिबट्या जेरबंद करण्यात आला होता. यावेळी माध्यम कर्मींसह वन विभागाच्या कर्मचारी जखमी झाले होते.

मध्यरात्रीपासून सिरीन मेडोज या वर्दळीच्या ठिकाणी बिबट्याचा संचार असल्याच्या माहितीमुळे परिसरात भीती पसरली आहे. याठिकाणी खरच बिबट्याचा वावर आहे का?, या परिसराच्या आजूबाजूला जंगल परिसर आहे, त्यामुळे याठिकाणी बिबट्याचा वावर असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून याबाबत माहिती मिळू शकलेली नाही.

Deshdoot
www.deshdoot.com